४,६१५ घरकुलांचे होणार बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 11:35 PM2017-09-01T23:35:32+5:302017-09-01T23:35:54+5:30
प्रत्येकाला हक्काचे घर असावे या उद्देशाने शासनाच्यावतीने विशेष प्रवर्गातील नागरिकांकरिता घरकूल योजना राबविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रत्येकाला हक्काचे घर असावे या उद्देशाने शासनाच्यावतीने विशेष प्रवर्गातील नागरिकांकरिता घरकूल योजना राबविली. या योजनेत वर्धा जिल्ह्यात ४ हजार ६१५ घरकुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यात १ हजार ६१५ घरे बांधण्यात आली तर उर्वरीत घरांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती आहे.
ग्रामीण भागातील बेघर असलेल्या किंवा कच्चे घर असलेल्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना व इतरांना हक्काचे घर मिळावे म्हणून घरकूल योजना राबविल्या जात आहे. यात अनुसूचित जाती (एस.सी.) रमाई आवास योजना, अनुसूचित जमाती (एस.टी.) रेषेखालील कुटुंबाना शबरी योजना व इतर कुटुंबासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजने अंतर्गत हक्काचे घरकूल बांधुन दिल्या जाते. २०१६-२०१७ या वर्षात ४ हजार ६१५ गरजूंना घरे बांधण्याचे उदिष्टये देण्यात आले होते. त्यात १ हजार १६० घरे गरजूंना बांधून देण्यात आले आहेत. तर ३ हजार ४५५ घरे बांधण्यात येणार आहे तर यातील घरे प्रगती पथावर असल्याची महिती आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत समिती, बांधकाम विभाग यांच्या मार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात गत अनेक वर्षांपासून बेघर व कच्चे घर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील व इतर गरीब कुटुंबाना योजनेने हक्कांचे घरकूल दिले आहे. या योजनेतील अनुसूचित जाती (एस.सी.) रमाई आवास योजना ७६६ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात २९३ घरकूल पूर्ण झाले असून ४७३ घरांचे काम सुरू आहे.
अनुसूचित जमाती (एस.टी.) शबरी योजना यात ३०२ घरकूल उदिष्टये देण्यात आली असून ३०२ मंजुरी झाली असून ११२ घरांचे कामे पूर्ण झाले आहे. तर १९० घरे बांधकाम बाकी आहे तर यात प्रगती पथावर आहे. तर इतर प्रवर्गासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यात ३ हजार ५४७ घरकुलाचे उदिष्टये देण्यात आले आहे. यात मंजुरी सुद्धा झाली असून यसात ७५५ घरे बांधण्यात आली आहे. यात २ हजार ७९२ घरकूल कामे सुरू असून ते लवकरच पुर्णत्त्वास जाणार आहे.