४७ आशा स्वयंसेविकांचा गौरव
By admin | Published: April 8, 2015 01:47 AM2015-04-08T01:47:40+5:302015-04-08T01:47:40+5:30
जागतिक आरोग्य दिन व बाल आरोग्य अभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण ४७ आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला.
वर्धा : जागतिक आरोग्य दिन व बाल आरोग्य अभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण ४७ आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आरोग्य व शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, महिला व बालकल्याण सभापती चेतना मानमोडे, जि.प. सदस्य सुनिता ढवळे, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना, डॉ. सोमलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मेसरे, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, डॉ. निमोदीया, डॉ. कुचेवार, डॉ. मोनिका चारमोडे, डॉ. रेवतकर यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना भेंडे यांनी बालआरोग्य अभियानांत वर्धा जिल्हा महाराष्ट्रातून अव्वल येण्याकरिता सामूहिक प्रयत्नाची गरज व्यक्त केली. तर मीना यांनी पुरस्कार मिळालेल्या आशांनी आता राज्य स्तरावर जिल्ह्याला नावलौकीक मिळून देण्याकरिता प्रयत्न करावे, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी केले. संचालन चंद्रकांत शहाकार यांनी केले तर आभार डॉ. रेवतकर यांनी मानले. कार्यक्रमाकरिता सर्वांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
पुरस्कार प्राप्त आशासेविका
जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांत जिल्हास्तरीय प्रथम मंजू शेंडे व द्वितीय पारितोषिक अर्पना आटे यांना मिळाले.
तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक कांचन सोमकुवर, शीतल लभाने, स्मिता वरखेडे, सिंधू मानकर, उज्ज्वला नाखले, वंदना नौकरकर, गीता नागोसे, मंगला मनोहर व द्वितीय पुरस्कार ज्योत्स्ना रासोकर, रेखा लोमडे, कुसुम नांदणे, अनिता चिकराम, मंगला भोगांडे, ज्योती वाघमारे, राजकन्या काटसरपे यांना प्रदान करण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील पारितोषिक रेखा बमनोटे, राणी मेढेकर, मिना पाटील, अर्चना कोल्हे, अर्चना दखने, संगिता बावणे, प्रतीभा वानखेडे, यमुना गाजरे, छबु नेहारे, सविता उईके, लता धवने, सुजाता भगत, गीता कांबळे, ममता खासरे, सारिका मसराम, सुनिता थुल, पंचशीला फुलमाळी, संगीता कोसमकर, सुलोचना सालोकर, प्रतीभा वानखेडे, अर्चना घुबडे, सविता वाघमारे, लता लुगसे, संगीता गोडघाटे, शोभा चरडे, उमा बिरहा, संध्या गांडोळे, आरोग्य सखी म्हणून महानंदा गोटे व द्वितीय मनोरमा चव्हाण आशा गटप्रवर्तक म्हणून प्रथम पुरस्कार सोनम वानखेडे, द्वितीय पुरस्कार ज्योत्सना कळसकर व तृतीय उज्ज्वला थुल यांना देण्यात आला.