जिल्ह्यात ४७ हवामान केंद्र, १३ साठी मिळाली जागा
By Admin | Published: July 5, 2017 12:22 AM2017-07-05T00:22:41+5:302017-07-05T00:22:41+5:30
शेतकऱ्यांना हवामानाबाबत नि:शुल्क माहिती मिळावी याकरिता जिल्ह्यात ४७ स्वयंचलित हवामान केंद्रांना शासनाने मंजुरी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांना हवामानाबाबत नि:शुल्क माहिती मिळावी याकरिता जिल्ह्यात ४७ स्वयंचलित हवामान केंद्रांना शासनाने मंजुरी दिली आहे. यात १३ केंद्रांकरिता जागा निश्चित झाली आहे. राज्य सरकारचे महावेध योजनेंतर्गत हे केंद्र स्थापित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी दिली.
भारती यांनी सांगितले की केंद्राकरिता जमिनीची सर्वेक्षण प्रक्रिया सुरू आहे. सहकार्याकरिता खासगी कंपनी स्कायमेट वेदर सर्विसेसची निवड केली आहे. सात वर्र्षांपर्यंत हा प्रकल्प चालविण्याची जबाबदारी कंपनीची राहील. मार्च २०१६ मध्ये केंद्राकरिता जमिनीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
वर्ल्ड मेट्रॉलॉजी आॅर्गनाइजेशन (डब्ल्युएमओ) तथा भारतीय हवामान शास्त्र विभागाद्वारे निर्धारित मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यात केंद्र सुरू करण्यात येईल. वर्ष २०१६-१७ मध्ये आर्वी तालुक्याच्या खुुबगाव, आर्वी, वाढोणा, मोरांगणा, विरुळ, रोहणा, आष्टी (शहीद) मध्ये आष्टी, तळेगाव, थार, कारंजा तालुक्यात उमरी, सावली, कन्नमवारग्राम, ठाणेगाव, समुद्रपूर तहसीलमध्ये समुद्रपूर, जाम, गिरड, नंदोरी, वायगाव, कोरा, कांढळी, मांडगाव, सेलू तालुक्यात सेलू, हिंगणी, झडशी, केळझर, सिंदी(रेल्वे), वर्धामध्ये पिपरी (मेघे), आंजी(मोठी), वायफड, सालोड, केळझर, वायगाव(नि.), सेवाग्राम, तळेगाव (श्या.पं.), हिंगणघाट तालुक्यात हिंगणघाट, वाघोली, सावली(वा.), कानगाव, वडनेर, पोहणा, अल्लीपूर, सिरसगाव, देवळी तालुक्यात देवळी, पुलगाव, विजयगोपाल, भिडी, आंदोरी, गिरोली येथे केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.