देशीदारुसह ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:46 PM2019-01-04T22:46:14+5:302019-01-04T22:46:45+5:30
खात्रिदायक माहितीच्या आधारे समुद्रपूर पोलिसांनी तालुक्यातील जाम-हिंगणघाट मार्गावरील पी.व्ही. टेक्सटाईल शिवारात नाकाबंदी करून दारूची तस्करी करणाऱ्या दोन युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी दुचाकीसह ४७ हजार २०० रुपयाची देशीदारू जप्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : खात्रिदायक माहितीच्या आधारे समुद्रपूर पोलिसांनी तालुक्यातील जाम-हिंगणघाट मार्गावरील पी.व्ही. टेक्सटाईल शिवारात नाकाबंदी करून दारूची तस्करी करणाऱ्या दोन युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी दुचाकीसह ४७ हजार २०० रुपयाची देशीदारू जप्त केली आहे. सदर आरोपींविरुद्ध दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहीती नुसार, समुद्रपूर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर जाम-हिंगणघाट मार्गावर पी.व्ही.टेक्सटाईल शिवारात नाकेबंदी करून काही वाहनांची पाहणी केली. दरम्यान एम.एच. ३२ एल. ७४६२ क्रमाकांच्या दुचाकीला अडवून दोघांना ताब्यात घेण्यात आले. सदर तरुणांजवळील साहित्याची पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या कारवाईत ७ हजार २०० रुपये किंमतीची ७२ शिश्या देशी दारू व दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण ४७ हजार २०० रुपयांचा मुुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सुनील नारायण मेश्राम आणि नितिन सुरेश भोयर दोन्ही रा. बुरकोनी तालुका हिंगणघाट यांच्याविरुद्ध दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, समुद्रपूरचे ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनात समुद्रपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अरविंद येनूरकर, रवी पुरोहित, आशीष गेडाम, वैभव चरडे आदींनी केली.
दुचाकीसह दारुसाठा पकडला
पुलगाव- खात्रिदायक माहितीच्या आधारे पुलगाव पोलिसांनी मौजा ठाणेगाव येथे नाकेबंदी करून दारूची तस्करी करणाºया प्रमोद लक्ष्मण नवरंग (३४) व प्रमोद भाऊराव घोडमारे (३६) दोन्ही रा. रोहणा यांना रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी एम.एच. ४० बी. ७१८५ क्रमांकाच्या दुचाकीसह देशी दारू असा एकूण २० हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पुलगावचे प्रभारी ठाणेदार बी. के. ढोले, दिलीप ठाकुर, अशोक भोयर, विवेक बनसोड, अनिल भोवरे, निकेश गुजर, पवन निलेकर, विकास मुंडे यांनी केली आहे. शहरात कुठेही दारूची विक्री होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन ढोले यांनी केले आहे.