४.७८ लाखांचा दारूसाठा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:03 PM2019-03-18T22:03:51+5:302019-03-18T22:04:04+5:30

ग्रा.पं. आणि लोकसभेची आगामी निवडणूक तसेच होळी या सणादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी या हेतूने पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी सालोड शिवारात नाकाबंदी करून केलेल्या कारवाईत कारसह ४.७८ लाखांचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई सावंगी पोलिसांनी केली.

4.78 lakhs of piracy caught | ४.७८ लाखांचा दारूसाठा पकडला

४.७८ लाखांचा दारूसाठा पकडला

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणुकीसह होळीच्या अनुषंगाने पोलिसांची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रा.पं. आणि लोकसभेची आगामी निवडणूक तसेच होळी या सणादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी या हेतूने पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी सालोड शिवारात नाकाबंदी करून केलेल्या कारवाईत कारसह ४.७८ लाखांचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई सावंगी पोलिसांनी केली.
पोलीस सूत्रानुसार, यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून वर्धा जिल्ह्यात दारूसाठा आणल्या जात असल्याची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी पो. स्टे. सावंगी (मेघे)च्या हद्दीतील सालोड शिवारात नाकेबंदी करून एम. एच. ३१ डी.के. ००८९ क्रमांकाच्या कार अडविली.
वाहनाची बारकाईने पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. वाहनातील राजेश उर्फ राजू मनोहर लढी रा. सालोड याला ताब्यात घेवून त्याच्याकडून १ लाख ७८ हजार ८०० रूपये किंमतीची दारू व दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली एम. एच. ३१ डी. के. ००८९ क्रमांकाची कार असा एकुण ४ लाख ७८ हजार ६०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राजेश उर्फ राजु मनोहर लढी (३२) रा. सालोड (हि.) याच्याविरुद्ध दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात सावंगीचे ठाणेदार आर. के. सिंगनजुडे, पोलीस उपनिरीक्षक गजानन दराडे, शंभरकर, नागापुरे, पंचटिके, गेडे, मोरे, खार्डे, डहाके, हनवते, जाधव यांनी केली. सावंगी (मेघे) परिसरात अनेक ढाब्यांवर कित्येक वर्षांपासून दारूची खुलेआम विक्री केली जात आहे. अनेक ढाबे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे असून राजकीय दबाव शिवाय अनेक पोलीस अधिकारी लाभार्थी असल्याने ढाब्यांवर कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. ढाब्यावरील अवैध दारूविक्रीला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: 4.78 lakhs of piracy caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.