वाहनासह ४.८० लाखांचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 10:24 PM2018-02-15T22:24:30+5:302018-02-15T22:25:01+5:30
तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर मार्गावर नाकेबंदी करीत जिल्हा दारुबंदी पथकाने चंद्रपुरकडे जाणारा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत देशी दारूच्या ३० पेट्यांसह वाहन असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर मार्गावर नाकेबंदी करीत जिल्हा दारुबंदी पथकाने चंद्रपुरकडे जाणारा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत देशी दारूच्या ३० पेट्यांसह वाहन असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्हा दारुबंदी झाल्यापासून या जिल्ह्यात नागपूर येथून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूकहोते. नागपूर -चंद्रपूर मागार्ने हा प्रकार गत काही दिवसांपासून वाढतच आहे. मात्र दारुबंदी पथकाद्वारे दारू वाहतुकीवर नियंत्रण लावण्यात येत येत असल्याने चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री दरम्यान याच मागार्ने दारूची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून दारुबंदी पथकाने आरंभा टोल नाक्यावर नाकेबंदी केली. यावेळी संशयीत वाहनाची तपाणी केली असाता असता एम.एच ४० एन ६२३२ क्रमांकाच्या कारमध्ये देशी दारू मिळून आली. या कारवाईत बलवीर उर्फ नंदु कोठुलाल रहामडाले रा.जरीपटका नागपूर याला अटक करण्यात आली आहे.
दारूबंदीची ही सदर करवाई जिल्हा दारुबंदी विषेश पथकाने पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अजय अवचट, श्रीकांत कडु, गणेश इंगोले, राहुल गिरडे, संजय सुर्यवंशी, गजानन कठाने, नितीन ताराचंदी, पप्पु वाघ, प्रमोद जांभुळकर आदिंनी केली.