शासनाच्या तूर खरेदीला ५ हजार ५० रुपये भाव

By admin | Published: January 6, 2017 01:38 AM2017-01-06T01:38:40+5:302017-01-06T01:38:40+5:30

वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत बाजार समितीच्या मुख्य यार्डवर केंद्र शासनाअंतर्गत दि विदर्भ को-

5 thousand rupees to buy the government's tur | शासनाच्या तूर खरेदीला ५ हजार ५० रुपये भाव

शासनाच्या तूर खरेदीला ५ हजार ५० रुपये भाव

Next

आधारभूत किमतीवर दिला बोनस
वर्धा : वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत बाजार समितीच्या मुख्य यार्डवर केंद्र शासनाअंतर्गत दि विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन शाखा वर्धा व भारतीय खाद्य निगम मार्फत तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सभापती पांडुरंग देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. तूर खरेदी ४ हजार ६२५ व त्यावर बोनस ४२५ रुपये असा ५ हजार ५० रुपये भाव देण्यात आला.
या कार्यक्रमाला दि विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन शाखा वर्धाचे व्यवस्थापक उमेश देशपांडे, भारतीय खाद्य निगमचे प्रतिनिधी संतोष धोटे, बाजार समितीचे सहा. सचिव माधव बोकाडे उपस्थित होते. शासनाने तुरीकरिता आधारभूत किंमत ४ हजार ६२५ व बोनस ४२५ रुपये जाहीर केली असल्याचे यावेळी सांगितले. समितीचे संचालक रमेश खंडागळे, कमलाकर शेंडे, जगदीश मस्के, पुरुषोत्तम टोनपे, पवन गोडे तसेच धान्य व्यापारी कैलास काकडे, भंवरलाल चांडक, मनोज दाते, गौरव मेघे, झाडे, रोठे, भुजाडे तसेच संपूर्ण कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी धान्य विक्रीस आणावे, असे आवाहन प्रभारी सभापती पांडुरंग देशमुख यांनी यावेळी केले. तसेच देशपांडे आणि भारतीय खाद्य निगमचे संतोष धोटे यांनी शेतकऱ्या याप्रसंगी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कृउबासच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 5 thousand rupees to buy the government's tur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.