महिनाभरात प्रवासादरम्यान ५० बसेस झाल्या ‘फेल’

By admin | Published: February 10, 2017 01:26 AM2017-02-10T01:26:40+5:302017-02-10T01:26:40+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रमाण जिल्ह्यात आजही कायमच आहे.

50 buses get 'failed' during the month | महिनाभरात प्रवासादरम्यान ५० बसेस झाल्या ‘फेल’

महिनाभरात प्रवासादरम्यान ५० बसेस झाल्या ‘फेल’

Next

पाच आगारात २८३ बसगाड्या : नादुरूस्त बसेसमुळे प्रवाशांना फटका
वर्धा: राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रमाण जिल्ह्यात आजही कायमच आहे. प्रवाशांच्या सेवेकरिता पूर्णत: फिट नसलेल्या बसगाड्या रस्त्याने धावत असल्याने झालेल्या रस्त्यात मध्येच ब्रेकडाऊन होत आहे. यामुळे मुळे प्रवाशांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. एका जानेवारी महिन्यात तब्बन ५० बसगाड्या प्रवासादरम्यान बंद पडल्याची नोंद विभागात आहे.
प्रवाशांना सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला आपली बस म्हणून शहरासह ग्रामीण भागातील नागरिक तिच्याकडे पाहत आहेत. या बसमधूनच त्यांचा प्रवास होत आहे. याच प्रवाशांच्या बळावर नफा कमविण्यात वर्धा विभागाने राज्यात नाव काढले आहे. मात्र याच प्रवाशांना सेवा अत्यावश्यक पुरविण्यात हा विभाग हयगय करीत असल्याचे दिसत आहे. रस्त्याने धावणाऱ्या बसगाड्या फिट आहेत अथवा नाही, याची कुठलीही शहानिशा न करता त्या पाठविण्यात येतात. या बसगाड्या रस्त्यात कुठेही बंद पडतात. याचा त्रास त्या बसमधून प्रवास करणाऱ्यांना सहन करावा लागतो.
प्रवाशांना सेवा पुरविण्याकरिता जिल्ह्यातील पाच आगारातून एकूण २८३ बसगाड्यांच्या माध्यमातून १,६६२ फेऱ्या होत आहेत. या रस्त्याने धावत असलेल्या बऱ्याच बसगाड्या नादुरूस्त असल्याचे दिसते. प्रवाशांच्या सेवेत धावत असलेल्या बऱ्याच बसगाड्यांची जीवनरेषाच ब्रेक झाल्याचा अंदाज त्यांची अवस्था पाहताच येतो. या गाड्यात ना धड आसन व्यवस्था ना धाडाच्या खिडक्या आहेत. त्यांची तावदाने तर केव्हाच फुटली असल्याचे दिसून आले आहे. बसच्या चालकाला मागाहून येणारे वाहन दिसण्याकरिता असलेला आरसाही (साईड मिरर) बऱ्याच गाड्यात दोरीने बांधलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारातून परिवहन महामंडळाच्या लालपरिचा प्रवास सुरू आहे. याच बसगाड्यांच्या आधारावर वर्धा विभाग नफा कमविण्यात राज्यात आघाडी घेत असून सेवांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.(प्रतिनिधी)

पाच आगारातून लालपरीच्या दररोज १६६२ फेऱ्या
नागरिकांना बससेवा पुरविण्याकरिता जिल्ह्यातून तब्बल १ हजार ६६२ बसफेऱ्या होत आहेत. मात्र यातील बऱ्याच बस प्रवासादरम्यान बंद पडत असल्याचे दिसून आले आहे. याचा त्रास बसमधील प्रवाशांना होत आहे. शिवाय परिवहन विभागालाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे. याचा विचार राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे झाले आहे.

Web Title: 50 buses get 'failed' during the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.