नुकसानाच्या तक्रारीला ५० दिवस लोटले; पंचनाम्याची प्रतीक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 05:09 PM2024-10-17T17:09:54+5:302024-10-17T17:12:00+5:30

पीकविमा कंपनी अधिकाऱ्यांची मनमानी : सोयाबिन पिकांची ९० टक्के झाली काढणी

50 days have passed since the complaint; Still waiting for Panchnama | नुकसानाच्या तक्रारीला ५० दिवस लोटले; पंचनाम्याची प्रतीक्षा कायम

50 days have passed since the complaint; Still waiting for Panchnama

लोकमत न्यूज नेटवर्क 
विजयगोपाल:
देवळी तालुक्यातील विजयगोपाल महसूल मंडळात ३१ ऑगस्टला अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या संदर्भात तक्रारीही केल्या. मात्र, याला ५० दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप पंचनामे करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. आजघडीला ९० टक्के सोयाबीन पिकाची काढणी झाल्याने कंपनीच्या आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांत तीव्र असंतोष आहे.


शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांना झालेल्या पिकाच्या नुकसानभरपाईसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविली आहे. शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभ घेण्यासाठी फक्त एक रुपयात शेतकऱ्यांना विमा काढून दिल्या गेला. वर्धा जिल्यात शासनाकडून आयसीआयसीआय लोम्बर्ड कंपनीने योजनेचे काम घेतले. हजारो शेतकऱ्यांनी हा पीक विमा काढलेला आहे. परंतु विमा काढल्यापासून तक्रार टाकल्यापासून आज जवळपास ५० दिवस झाले. जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी झाली. तरीही शेतकऱ्याच्या शेतात अजूनही पंचनामे झाले नाही, विजयगोपाल महसूल मंडळात ३१ ऑगस्टला अतिवृष्टी झाली होती. १४४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. नुकसानाच्या ७२ तासांच्या आत तक्रारी केल्यास २५ दिवसांच्या आत पंचनामे केले जातील, असे सांगण्यात आले होते. परंतु तक्रारी टाकल्यापासून ५० दिवस पूर्ण झाले तरी पंचनामे करण्यात आले नाही. 


मंडळात १२०० तक्रारी 
विजयगोपाल महसूल मंडळात नुकसान झाल्याच्या १ हजार २०० तक्रारी आल्याचे कंपनीच्या तालुका कार्यालयातून कळविण्यात आले. आतापर्यंत निम्म्या तक्रारीचे पंचनामे झाले असून, अजून जवळपास ६०० ते ७०० तक्रारींचे पंचनामे व्हायचे असल्याचे बोलले जात आहे. एकट्या विजयगोपालमधील २०० पंचनामे बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे.


"पंचनामे झाले नाही तर तक्रारी रद्द झाल्या असतील किंवा सरासरी सॅम्पल लागले असतील. हे बघून सांगावे लागेल." 
- वसीम शेख, जिल्हा समन्वयक, आयसीआयसीआय लोम्बार्ड.


"शेतात झालेल्या पीक नुकसानाची १ सप्टेंबरला तक्रार टाकली. अजूनपर्यंत शेतातील पंचनामे झाले नाहीत. माझ्यासारखे अजून २०० शेतकरी आहेत. जर दोन दिवसांत यावर काही तोडगा निघाला नाही तर आम्ही कंपनीविरोधात आंदोलन करू."
- अभिलाष धांगे, शेतकरी 


"तुमच्या तक्रारी रद्द झाल्या असतील, असे सांगितले. परंतु डॉकेट आयडी आल्यावर तक्रारी रद्द कशा होतील आणि रद्द झाल्या तर शेतकऱ्यांना कळविले का नाही. ही कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. याकरिता कंपनीला याचे परिणाम भोगावे लागतील."
- राहुल पेटकर, उपजिल्हाध्यक्ष, युवा संघर्ष मोर्चा

Web Title: 50 days have passed since the complaint; Still waiting for Panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.