धाम नदीपात्रातून निघाला ५० टिप्पर गाळ

By Admin | Published: October 29, 2015 02:24 AM2015-10-29T02:24:09+5:302015-10-29T02:24:09+5:30

येथील धाम नदीपात्रात गणपती व दुर्गा मूर्ती विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणात गाळ साचतो.

50 drizzle sour from Dham river basin | धाम नदीपात्रातून निघाला ५० टिप्पर गाळ

धाम नदीपात्रातून निघाला ५० टिप्पर गाळ

googlenewsNext

नदी स्वच्छता अभियान : आमदारांसह इतरही जनप्रतिनिधींची उपस्थिती
पवनार : येथील धाम नदीपात्रात गणपती व दुर्गा मूर्ती विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. त्यामुळे राहिलेले मूर्तीचे अवशेष व मूर्ती विरघळून निर्माण झालेला गाळ काढण्यासाठी ग्रा.पं. पवनार प्रशासन आणि दत्ता मेघे फाऊंडेशनच्या वतीने धाम नदी घाट स्वच्छता अभियान बुधवारी राबविण्यात आले. यावेळी तब्बल ५० टिप्पररच्या वर गाळ नदीपात्रातून काढण्यात आला. यात जनप्रतिनिधींसह ग्रामस्थांनी मोठा सहभाग नोंदविला. अभियानाची सुरूवात आमदार पंकज भोयर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी दत्ताघ्घ्र फाऊंडेशनचे उदय मेघे, संजय इंगळे तिगावकर, वैभव मेघे, गुंडू कावळे, मनोज तरारे चचाटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आ. पंकज भोयर म्हणाले, पवनार ग्रा. पं. ने ग्रामसभेच्या माध्यमातून प्रत्येक सार्वजनिक मंडळाकडून साफ सफाई करून घेण्याचा ठरावा मंजूर करून घ्यावा. पुढच्या वर्षीपासून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी अश्या सूचनाही त्यांनी दिल्या. पर्यावरणपुरक विसर्जनासाठी कुंडाची मागणी प्रस्तावित असून त्याला मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आश्रम परिसरात कचरा कुंड्यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे, त्याचबरोबर याठिकाणी येथे व्यवसाय करीत असलेल्या व्यावसायिकांनीही रोज परिसर साफ करावा अश्या सूचनाही त्यानी दिल्या. त्याचप्रमाणे प्रत्येकाने कर्तव्य समजून स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला तर नदी पूर्वीसारखी स्वच्छ व निर्मळ व्हायला वेळ लागणार नाही. असे उदय मेघे यावेळी म्हणाले. सायंकाळपर्यंत या कुंडातून जवळपास ५० टिप्पर गाळ बाहेर काढण्यात आला असला तरी २५ टक्के मलबाही बाहेर निघालेला नाही. यासाठी येत असलेला खर्च करणे ग्रा.पं.च्या आवाक्याबाहेर असल्याचे सरपंच गांडोळे यांनी यावेळी बोलून दाखविले. याप्रसंगी जि.प. सदस्या वैशाली गोमासे, सुनिता ढवळे, ग्रा. पं.चे सदस्य जगदीश पेटकर, नितीन कबाडे, नाजिम पठाण, प्रमोद लाडे, वर्षा तागडे, अर्चना डगवार, राणी धाकतोड, उमाटे, शालीनी आदमने, डॉ. तोटे, उद्धव चंदनखेडे, जयंत गोमासे, अनंत मुडे, विस्तार अधिकारी विठ्ठल जोगे, यासह शिक्षकवृंद व अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते.(वार्ताहर)

प्रत्यक्षात नदीची स्वच्छता ही बाब जि. प. व सिंचन विभागाच्या अखत्यारीतील आहे. परंतु या दोन्ही विभागांनी भुतकाळात कधीही साफसफाई मोहीम न राबविल्यामुळे नदी प्रदूषित झालेली आहे. धाम नदी पात्रातील पालखी डोह या कुंडाची निर्मिती ही पोहणाऱ्यांसाठी करण्यात आली होती. परंतु याच कुंडात मूर्ती विसर्जन केले जात असल्याने तो पूर्णत: बुजण्याच्या स्थितीत आहे. गाळ सडून परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

स्वच्छता अभियानाची माहिती जिल्हा परिषदेसह सर्व दुर्गा व गणेश मंडळाना ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे देण्यात आली होती. तरीही जि. प.सह एकाही मंडळाचा यावेळी सहभाग नव्हता. उत्सवासाठी ही मंडळे लाखोंचा खर्च करतात. निरनिराळे उपक्रम राबवितात. परंतु स्वच्छतेसाठी आवाहन केल्यावर मात्र एकाही मंडळाने याची दखल घेतली नाही. जिल्हा प्रशासनानेही याकडे पाठ फिरविल्याची खंत सरपंच गांडोळे यांनी बोलून दाखविली.

पवनारवासियांना याच नदीचे पाणी पिण्याकरिता मिळते. त्यामुळे असे दूषित पाणी पोटात गेल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणपुरक विसर्जन कुंडाची मागणी पालकमंत्र्यांकडे गतवर्षी करण्यात आली होती. त्यांनी तसे आदेशही दिले. परंतु सदर काम बांधकाम विभागाने करायचे की सिंचन विभागाने हा गोंधळ कायम आहे. पुढील उत्सवापर्यंत तरी हा गोंधळ दूर व्हावा अशी अपेक्षा ग्रा. पं. ने व्यक्त केली आहे.

मंडळांवर कर आकारण्याची गरज
धाम नदीपात्राचे प्रदूषण टाळण्यासाठी कठोर उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्यामुळे मंडळाला मूर्ती विसर्जनाची परवानगी देतेवेळेस विसर्जन पर्यावरण पूरक करण्याचे हमीपत्र त्यांच्याकडून घेणे गरजेचे आहे. तसेच मंडळावरही साफ सफाई कर आकरणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
सायंकाळपर्यंत जवळपास ५० टिप्पर गाळ उपसण्यात आला. परंतु पात्रातील २५ टक्केही गाळ अद्याप निघालेला नाही. त्यामुळे येथे किती गाळ विसर्जकाळात निर्माण होतो याची कल्पना येते. तसेच दूर्गा मूर्ती विसजर्नापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे विसर्जित गणेशमूर्ती बाहेर काढण्यात आल्या. यावेळी अनेक मूर्ती प्लास्टक आॅफ पॅरिसच्या असल्याने जशाच्या तश्या बाहेर निघाल्या. त्यामुळे पुढच्या वर्षी अश्या मंडळाच्या मूर्ती नदीपात्रात विसर्जित करू देणार नाही असा निर्धार ग्रामपंचायतने यावेळी केला.

दुर्गा व गणेश मंडळाना सहभागाबाबत विनंती करूनही त्यांनी याबाबत उदासिनता दर्शविली. ही बाब खेदजनक आहे. धार्मिक उत्सव आपण जेवढ्या मनोभावे साजरे करतो, तेवढीच सहिष्णुता विर्सजनाबाबतही जोपासणे गरजेचे आहे. न विरघळलेल्या मूर्तींचे अवशेष जेव्हा वेड्यावाकड्या परिस्थितीत दिसतात तेव्हा अनेकांच्या धार्मिक भावना दुखावतात. ही वेळच येऊ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
-अजय गांडोळे
सरपंच ग्रा.पं. पवनार

Web Title: 50 drizzle sour from Dham river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.