५० फूट लांबीचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 09:50 PM2017-08-19T21:50:48+5:302017-08-19T21:51:15+5:30
अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांनी आयटकच्या नेतृत्वात शनिवारी ३५ मागण्यांचा समावेश असलेले ५० फुट लांबीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांनी आयटकच्या नेतृत्वात शनिवारी ३५ मागण्यांचा समावेश असलेले ५० फुट लांबीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. सदर निवेदन देण्याकरिता अंगणवाडी सेविकांनी रेल्वे स्थानकासमोरून मोर्चा काढला. शहरातून निघालेल्या या मोर्चात असलेले एवढे मोठे निवेदन पाहून शहरातील नागरिकही अवाक् झाले.
जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या या निवेदनात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व शालेय पोषण आहार देणाºया कर्मचाºयांना शासनाच्या इतर कर्मचाºयांप्रमाणे किमान वेतन देण्यात यावे. सोबतच डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम.एम. कलबुर्गी यांची हत्या करणारे अद्यापही मोकाट असून त्यांना तात्काळ जेरबंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. आस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे त्यांना दिलासा देण्याकरिता देण्याकरिता कुठलीही अट न ठेवता सरसकट कर्जमाफी देवून शेतकºयांचा सातबारा कोरा करावा, शेतकरी हितार्थ असलेला स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, शिक्षणाचे होणारे बाजारीकरण थांबविण्यासाठी सरकारने योग्य पाऊल उचलावे तसेच ओबीसी, एससी, एनटी यांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ द्यावा. केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण मोफत करण्यात यावे. विज्ञान व तंत्रज्ञान संशोधनासाठी भरीव अनुदानाची तरतूद करावी. जीएसटी कायद्यात सुधारणा करावी. आदी मागण्यासाठी सदर मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाचे नेतृत्त्व आयटकचे राज्यसचिव दिलीप उटाणे, जिल्हासंघटक असलम पठाण यांनी केले. मोर्चा दुपारी २ वाजताच्या सुमारास न्यायालयाच्या मुख्यद्वारासमोर आला असता पोलिसांनी तो अडविला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने ५० फुट लांबीचे ३५ मागण्यांचा समावेश असलेले निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले.
मोर्चात मोहन पचारे, विजया पावडे, वंदना कोळणकर, सुरेश गोसावी, गुणवंत डकरे, ज्ञानेश्वरी डंभारे, मैना उईके, मंगला इंगोले, विमल कौरती, सुनंदा आखाडे, शोभा तिवारी, रेखा कातोडे, नलीनी चौधरी, माला भगत, शोभा सायंकार, यमुना नगराळे, रमेश बोंदरकर, वैशाली नंदरे यांच्यासह अंगणवाडी आणि आशा सेविकांचा सहभाग होता.
निवेदन पाहून अनेक अवाक्
आयटकच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार हे निवेदन रस्त्याने घेवून अंगणवाडी सेविका निघाल्या असता ते पाहून शहरातील नागरिक अवाक् झाले. निवेदन स्वीकारतानाही निवासी जिल्हाधिकाºयांनी तारांबळ उडाल्याचे दिसून आले.