आदिवासी भवन व गं्रथालयासाठी ५० लाख

By admin | Published: May 7, 2016 02:04 AM2016-05-07T02:04:56+5:302016-05-07T02:04:56+5:30

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी शासनाकडून होत आहे. आदिवासींच्या जीवनात बदल घडविण्याचे आमचे धारेण आहे.

50 lakhs for tribal building and library | आदिवासी भवन व गं्रथालयासाठी ५० लाख

आदिवासी भवन व गं्रथालयासाठी ५० लाख

Next

सुधीर मुनगंटीवार : राज्यातील सहा हजार अंगणवाड्या डिजीटल करणार
वर्धा : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी शासनाकडून होत आहे. आदिवासींच्या जीवनात बदल घडविण्याचे आमचे धारेण आहे. यामुळे वर्धा येथे समाज भवन व ग्रंथालयासाठी जिल्हा नियोजन विकास निधी मधून ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आदिवासी युवकांना शिक्षणाच्या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सहा हजार अंगणवाड्या डिजीटल करण्यात येणार असून यासाठी ६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रतिपादन राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत वर्धा येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन तसेच आदिवासी कला महोत्सव व प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटन शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. पंकज भोयर उपस्थित होेते. यावेळी आ. राजू तोडाम, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, बाबूराव उईके-पाटील, बाळा जगताप, राजू मडावी, अशोक कलोडे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यासह आदिवासी नेते यावेळी उपस्थित होते.
आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकासासाठी शासनाने विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केली असून आदिवासी विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जंगलातील आश्रम शाळा ऐवजी तालुकास्तरावरील नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
आदिवासी समाजातील ज्या शूरविरांनी स्वातंत्र्यासाठी तसेच आदिवासींच्या कल्याणासाठी काम केले आहे. अशा २५ वीर पुरुषांचा सन्मान करण्यात येईल. त्यासोबतच शहीद बाबूराव शेडमाके यांच्या यथोचित स्मारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन
वर्धा येथील रामनगर परिसरात सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी खा.रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे, प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी प्रकल्प अधिकारी मडावी तसेच सहायक प्रकल्प अधिकारी आर.बी. मानकर यांनी स्वागत करुन आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवादूत प्रकल्प

Web Title: 50 lakhs for tribal building and library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.