५०० शेतकऱ्यांना होणार सिंचनाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:09 AM2018-12-29T00:09:39+5:302018-12-29T00:10:20+5:30
जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असलेल्या दहेगाव गोंडी येथील तलावाच्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम जलयुक्त शिवारमधून सुरू करण्यात आले असून यामुळे ६०० हेक्टर सिंचनक्षमता पुनर्स्थापित होणार आहे. तसेच ४ गावांतील ५०० शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असलेल्या दहेगाव गोंडी येथील तलावाच्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम जलयुक्त शिवारमधून सुरू करण्यात आले असून यामुळे ६०० हेक्टर सिंचनक्षमता पुनर्स्थापित होणार आहे. तसेच ४ गावांतील ५०० शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होईल.
दहेगाव गोंडी येथे लघुसिंचन तलाव आहे. या तलावातून सिंचनासाठी ७ किलोमीटरचा मुख्य कालवा, तसेच ५.२० किलोमीटरचा एक आणि दीड किलोमीटरचे २ असे तीन लघुकालवे आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून कालव्यांच्या दुरुस्तीचे काम झाले नसल्यामुळे कालव्यामध्ये झाडे वाढली होती. मातीने कालवे बुजले होते. परिणामी, शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे तलावातून अपेक्षित सिंचन होऊ शकत नव्हते. मागील ५ वर्षांत या तलावातून केवळ ८० हेक्टर सिंचन झाले आहे. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी गावकºयांकडून वारंवार केली जात होती. कालव्याची दुरुस्ती आणि गाळ उपसण्याचे काम जलयुक्त शिवारमधून करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घेऊन प्रस्तावाला मंजुरी दिली.
दहेगाव गोंडी येथील तलावाच्या कालव्याचे दुरुस्तीचे काम जलयुक्त शिवारमधून सुरू करण्यात आले. या कालव्याच्या दुरुस्तीमुळे काचनूर, खरांगणा, कासारखेडा, मासोद या गावातील सुमारे ५०० शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था तयार करावी आणि त्यासाठी अविरोध निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. तसेच गुरे असणाºया शेतकऱ्यांनी चा-यासाठी मक्याची लागवड करावी. कालव्याचे काम १५ दिवसांत पूर्ण होऊन चारा लागवडीसाठीसुद्धा तलावाच्या पाण्याचा वापर करता येईल. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी तत्काळ मागणी करावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. अशा पद्धतीच्या कालवा दुरुस्ती कामाचे प्रस्ताव कुऱ्हा, टेंभरी, हराशी या गावांसाठीसुद्धा तयार केले आहेत. त्याला मान्यता मिळाल्यावर तेथील कामसुद्धा सुरू करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता काळे आणि आवीर्चे उपअभियंता राजीव दामोधरे यांनी सांगितले.