जिल्ह्यात ५२ नवीन साठवण बंधारे
By admin | Published: December 29, 2014 11:47 PM2014-12-29T23:47:40+5:302014-12-29T23:47:40+5:30
जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागामार्फत ५२ नव्या साठवण बंधाऱ्यांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली. या बंधाऱ्यासाठी अंदाजपत्रीय किमत सहा कोटी ५ लाख १६ हजार रुपये
वर्धा : जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागामार्फत ५२ नव्या साठवण बंधाऱ्यांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली. या बंधाऱ्यासाठी अंदाजपत्रीय किमत सहा कोटी ५ लाख १६ हजार रुपये असून ३५९ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.
वर्धा तालुक्यात ११ बंधारे होणार आहे. यामुळे ९१ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे. यामध्ये पुलई, नेरी, अंबोडा, सालोड येथे दोन, जुगाधरी (लोन.), झाडगाव, बेलगाव, मदनी व तरोड्याचा समावेश आहे. या प्रत्येक बंधाऱ्यांची सिंचन क्षमता प्रत्येकी सात ते आठ हेक्टर शेतजमीनीची आहे.
देवळी तालुक्यात आठ बंधाऱ्यामुळे ४२ हेक्टरातील सिंचन अपेक्षित आहे. यामध्ये येसगाव येथे दोन, लोणी, अडेगाव, आगरगाव, आकोली -२, काजळसरा या गावांचा समावेश आहे. यात इंझाळा गावाचा समावेश आहे; मात्र निवडलेले स्थळ त्रांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे.
सेलू तालुक्यातील झडशी, हेलोडी-२, हेलोडी(हिवरा-बोर)-२ व परसोडीचा समावेश आहे. यामध्ये २९ हेक्टरातील सिंचन अपेक्षित आहे. आर्वी तालुक्यातील बोथली-वर्धमनेरी, मार्डा व शहाबादपूरचा समावेश आहे. यामुळे १७ हेक्टरातील सिंचन अपेक्षितआहे.
आष्टीतील पाचमध्ये साहूर, तळेगाव(श्या.), लहानआर्वी, सिंदीविहिरा व नरसिंगपूरचा समावेश आहे. यामुळे ३७ हेक्टर क्षेत्र सिंचित होणे अपेक्षित आहे. कारंजातील पाचमध्ये भालेवाडी-२, राहाटी-२, ढगा, चोपन, बेलगाव व सेलगाव(लवणे)-२ चा समावेश आहे. यामुळे ४५ हेक्टरातील सिंचन अपेक्षित आहे. हिंगणघाट तालुक्यात नऊ सावठण बंधारे होणार आहे. यामुळे हडस्ती, रोहणखेडा, वाघोली, शेगाव कुंड, फुकटा, गाडेगाव, भैय्यापूर, कानगाव, या गावांतील ५८ हेक्टर शेतजमीन सिंचित होणे अपेक्षित आहे. वेणी गावाचा समावेश आहे; मात्र निवडलेले स्थळ त्रांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. समुद्रपूर तालुक्यातील सहामध्ये वायगाव(हळद्या), नंदोरी, वाशी, रामनगर, बोथुडा व वडगावचा समावेश आहे. येथील ४० हेक्टर क्षेत्र सिंचित करण्याची क्षमता सदर बंधाऱ्यांची आहे.(जिल्हा प्रतिनिधी)