५.३७ लाखांचा जुगार

By Admin | Published: September 25, 2016 02:01 AM2016-09-25T02:01:42+5:302016-09-25T02:01:42+5:30

येथील सावंगी (मेघे) बायपासवर असलेल्या हॅपी टॉवर परिसरात जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत १८ जणांना अटक करण्यात आली.

5.37 lakh gambling | ५.३७ लाखांचा जुगार

५.३७ लाखांचा जुगार

googlenewsNext

१८ जणांना अटक : सावंगी येथील घटना
वर्धा : येथील सावंगी (मेघे) बायपासवर असलेल्या हॅपी टॉवर परिसरात जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत १८ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून १ लाख ३२ हजार ५४० रुपयांच्या रोख रक्कमेसह ५ लाख ३७ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली.
शेख आसीफ शेख यासीन, शेख अहमद शेख नूर (२९), आकीब शेख जलील शेख (४२), सहेजाद शेख याकुब शेख (२२), इम्रान शेख जब्बार शेख (२४), जिमीत हिम्मतकुमार व्यास (२८), शेख अहेमद शेख रशीद (२८), शेख रज्जब शेख जलील (२२), मोहम्मद उस्मान मोहम्मद मजहर (२६), शेख आबीद शेख इब्राहीम (२९), कृष्णा बनवारीलाल जोशी (२४), जाबाद शेख शाकीब शेख (२१), भारत संपत कळमकर (४९), शेख सलीम शेख गफार (२२), राजू आदीनाथ सावद (२९), गौरव प्रकाश देशमुख (२४), अकील अहेमद रकीब अहेमद (३५) आदींना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलीस सुत्रानुसार, यवतमाळ-नागपूर बायपासवर असलेल्या हॅपी टॉवर येथे जुगार सुरू असल्याची माहिती ठाणेदार संतोष शेगावकर यांना मिळाली. त्यांनी मिळालेल्या माहितीवरून हॅपी टॉवर येथे धाड घातली. येथे अटकेत असलेले १८ जण ५२ ताशपत्त्यावर जुगार खेळत असल्याचे मिळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत रोख १ लाख ३२ हजार ५४०, विविध कंपन्यांचे २२ मोबाईल व दोन दुचाकी असा ५ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मुंबई जुगार कायद्याच्या कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेत असलेल्या १८ ही जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: 5.37 lakh gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.