५४१ शेतकऱ्यांनी केली सौर कृषिपंपाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:45 PM2019-01-23T23:45:23+5:302019-01-23T23:47:08+5:30

निसर्गाचा लहरीपणा आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून विद्युत जोडणी देताना राबविण्यात येणाऱ्या अडेलतट्टू धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होत त्याचा लाभ शेतकºयांना कसा देता येईल, या उद्देशाने शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून सौर कृषिपंप देण्याची योजना आहे.

541 farmers demand solar farming | ५४१ शेतकऱ्यांनी केली सौर कृषिपंपाची मागणी

५४१ शेतकऱ्यांनी केली सौर कृषिपंपाची मागणी

Next
ठळक मुद्देएचव्हीडीएस योजना : केवळ सात जणांना दिली जोडणी

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निसर्गाचा लहरीपणा आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून विद्युत जोडणी देताना राबविण्यात येणाऱ्या अडेलतट्टू धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होत त्याचा लाभ शेतकऱ्यांना कसा देता येईल, या उद्देशाने शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून सौर कृषिपंप देण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एप्रिल २०१८ पासून ते आतापर्यंत ५४१ शेतकऱ्यांनी रितसर आवेदन महावितरणकडे सादर केले असून आतापर्यंत केवळ सात शेतकऱ्यांनाच जोडणी देण्यात आली आहे. परिणामी, या योजनेच्या प्रभावी जनजागृती करण्याची गरज आहे.
प्राप्त माहितीनुसार, ज्या शेतकऱ्याच्या कृषिपंपाला विद्युत जोडणी देताना किमान ६०० मीटरच्यावर ११ केव्ही विद्युत वाहिनी टाकावी लागते, त्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला विद्युत जोडणी न देता त्यांना उच्चदाब वितरणप्रणाली या योजनेच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाने सौर कृषीपंप कसे देता येईल, यासाठी सध्या महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. मार्च २०१८ अखेरपर्यंत वर्धा जिल्ह्यात २ हजार ६३३ सौरकृषीपंप शेतकऱ्यांना देण्याचे उद्दिष्ट शासनाच्यावतीने देण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत केवळ सात शेतकऱ्यांच्या सौरकृषीपंपाला जोडणी देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना किमान आठ तास वीजपुरवठा देण्याचे सरकारचे धोरण असले तरी जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसाला वीजपुरवठा केला जात नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडते. ही योजना शेतकरी हितार्थ असून या समस्येवर मात करण्यासाठी सौर कृषिपंप हा चांगला पर्याय ठरू शकत असल्याने त्याचे फायदे सध्या महावितरणचे अधिकारी व कर्मचाºयांकडून शेतकºयांना समजावून सांगितले जात आहेत.
प्रस्तावाला मंजुरी देण्याचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांना
उच्चदाब वितरणप्रणाली (एचव्हीडीएस) या योजनेच्या माध्यमातून महावितरणकडून सौर कृषिपंप मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे क्रमप्राप्त आहे.
सुमारे चार दिवसांपूर्वी महावितरणने त्यासाठी नवीन वेबसाईट तयार केली असून त्यावर शेतकºयांनी प्रस्ताव सादर करावा, असे सांगण्यात येते. या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा अधिकार सध्या महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांना असल्याचेही सांगण्यात आले.
तीन आणि पाच एचपीच्या सौरकृषीपंपांची होतेय चाचणी
प्राप्त आवेदनानंतर कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून ते प्रस्ताव संबंधितांकडे पाठविण्यात आले. त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार होत सध्या जिल्ह्यासाठी तीन आणि पाच एचपीचे सौर कृषिपंप प्राप्त झाले आहेत. त्याची चाचणी जिल्ह्यातील १२ ठिकाणी होणार असल्याचे सांगण्यात आले.

२३१ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप घेण्यासाठी घातले जातेय साकडे
विद्युत जोडणीसाठी प्राप्त झालेल्या आवेदनापैकी २३१ अर्ज निकाली काढताना तसेच प्रत्यक्ष कामादरम्यान काही तांत्रिक अडचणी येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. सदर शेतकऱ्यांना विद्युत जोडणी देण्यासाठी किमान ६०० मीटरच्यावर ११ केव्हीची विद्युत वाहिनी टाकावी लागत असल्याचे आणि ते महावितरण तसेच शेतकऱ्याला न परवडणारे असल्याने प्रामुख्याने निदर्शनास आल्याने या २३१ शेतकºयींनी सौरकृषीपंप घ्यावा, असे सध्या महावितरणच्या अधिकाºयांकडून पटवून दिले जात आहे.

Web Title: 541 farmers demand solar farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.