वर्धा जिल्हयात शनिवार रात्री आठ पासुन 60 तासाची संचारबंदी लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 05:21 PM2021-03-25T17:21:51+5:302021-03-25T17:22:06+5:30
सदर कालावधित शासनस्तरावर पुर्वनियोजित असलेल्या परीक्षा कोविड विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन घेता येतील.
वर्धा : कोरोना बाधिताची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर 27 मार्चचे रात्री 8 वाजता पासुन 30 मार्चचे सकाळी 8 वाजता पर्यंत जिल्हयात संचारबंदी लागू केली आहे.
सदर कालावधित शासनस्तरावर पुर्वनियोजित असलेल्या परीक्षा कोविड विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन घेता येतील. तसेच परीक्षार्थ्यांना वाहतुकीकरीता उपलब्ध सार्वजनिक बससेवा किंवा खाजगी वाहनांना परवाणगी राहील. परंतु सबंधित परिक्षार्थ्यांनी परिक्षेचे प्रवेशपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत अन्य प्रवाशांची वाहतुक करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या संचार बंदी आदेशात नमुद आहे.