६० हजार बेरोजगारांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:27 PM2018-01-28T23:27:13+5:302018-01-28T23:28:35+5:30
बेरोजगारी दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात दररोज बेरोगारांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. वर्षभरात जिल्ह्यात ६० हजार ३८९ बेरोजगारांनी आपल्या नावाची नोंदणी केल्याची माहिती आहे.
गौरव देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बेरोजगारी दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात दररोज बेरोगारांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. वर्षभरात जिल्ह्यात ६० हजार ३८९ बेरोजगारांनी आपल्या नावाची नोंदणी केल्याची माहिती आहे. या नोंदीवरून बेरोजगारांची फौज वाढत असल्याचे दिसून येत आहे.
मागील वर्षी वर्षभरात ८ हजार ८०६ बेरोजगारांची नोंदणी झाली होती; पण प्रत्येक वर्षी हजारो युवक शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात फिरताना आढळतात. रोजगार मिळावा या हेतूने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात आपल्या नावाची नोंदणी करून नोकरीची प्रतीक्षा करतात. हा विभागही सध्या हायटेक झाला आहे; पण सामान्य शेतकºयांच्या मुलापर्यंत रोजगार पोहोचत नसल्याचे चित्र आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात बेरोजगार युवकांच्या रोजगार निर्मितीकरिता कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. प्रत्येक वर्षी दहावी, बारावी व पदवी घेणाºया युवकांच्यास संख्येसोबतच बेरोजगारीही वाढत असल्याचे दिसून आले आहे.
तालुकास्तरावर घेतले जातात मेळावे
जिल्ह्यातील बेरोजगारांची वाढती संख्या पाहता येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. यात वर्धा, आष्टी, देवळी, हिंगणघाट येथील मेळाव्यात युवकांची प्राथमिक निवड करण्यात आली. बेरोजगारांनी नोंदणी कार्डची वैधता संपल्यानंतर नुतनीकरण केले नाही. जिल्ह्यात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्रात गतवर्षी ८ हजार ८०६ बेरोजगारांची नोंद झाली होती. यात ५ हजार ३२० मुले तर ३ हजार ५०४ मुलींची नोंदणी झाली होती. यावर्षी एकूण ६० हजार ३८९ बेरोजगारांची नोंद झाली. यात मुलाची संख्या ४० हजार ७६८ तर मुलींची संख्या १९ हजार ६२१ आहे. जिल्ह्यात सहा रोजगार मेळावे घेतले असून २८१ उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अधिकाधिक बेरोजगार उमेदवारांना सहज शक्य व्हावे म्हणून शासनाने आॅनलाईन अर्जाची सुविधा केली आहे. आमच्या विभागाद्वारे तालुकास्तरावर रोजगार मेळावे घेण्यात येतात. रोजगाराची सुविधा व्हावी यासाठीही आमचा विभाग प्रयत्नशील आहे.
- दा.सी. कोसारे, वरिष्ठ लिपीक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा.