६०० पोलिसांचे क्रीडा प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 11:48 PM2018-10-04T23:48:24+5:302018-10-04T23:48:49+5:30

स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर तीन दिवस नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पाच जिल्ह्यातील सहाशे खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपले क्रीडा प्रदर्शन दाखविले.

600 police sporting exhibition | ६०० पोलिसांचे क्रीडा प्रदर्शन

६०० पोलिसांचे क्रीडा प्रदर्शन

Next
ठळक मुद्देअर्जुुन पुरस्कार विजेत्या ललीता बाबर यांचे हस्ते झाला सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर तीन दिवस नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पाच जिल्ह्यातील सहाशे खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपले क्रीडा प्रदर्शन दाखविले. या स्पर्धेचा गुरुवारी दुपारी ४ वाजता समारोप झाला.
पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमात अर्जुन पुरस्कार विजेत्या ललीता बाबर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी
अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मलिकार्जुन प्रसन्ना, पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी परिक्षेत्रीय पोलीस विभागाकडून मानवंदना स्विकारून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी सर्वोत्कृष्ट पुरूष खेळाडू म्हणून वर्ध्याच्या पोलीस मुख्यालयातील दीपक ठाकरे व सवोत्कृष्ट महिला खेळाडू सुनैना डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. पुरूष व महिला जनरल चॅम्पीयनशिप चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाने पटकावली. तर वर्धा पोलीस विभागाला व्दितीय स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत हॉकी, बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल, खो-खो, कबड्डी, बॉक्सींग, ज्युडो, वेटलिफ्टींग, अ‍ॅथेलॅटिक्स या मैदानी खेळांचा समावेश होता. चंद्रपूर, वर्धा, नागपूर ग्रामीण, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील एकूण ६०० पोलीस खेळाडूंनी या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करुन विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांचेही कौतूक करुन पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या
नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे, पोलीस निरीक्षक बबन मोहंदुळे, शालिक उईके, बोरकुटे, सूर्यवंशी, घरडे, दत्तात्रय गुरव व पोलीस कर्मचारी दिलीप थाटे, चंदकांत जिवतोडे, आरीफ खान, रंजीत यादव, गजानन कठाणे, रंजीत काकडे, रवींद्र वानखेडे, रवी रामटेके, देवेंद्र उडाण, विनोद रघाटाटे या यांनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: 600 police sporting exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस