६९ उमेदवारांचे भवितव्य ठरणार
By admin | Published: October 14, 2014 11:21 PM2014-10-14T23:21:35+5:302014-10-14T23:21:35+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार असून चारही विधानसभा मतदार संघात जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण ६९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य
आज मतदान : १० लाख ४० हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
वर्धा : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार असून चारही विधानसभा मतदार संघात जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण ६९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य १० लाख ४० हजार २४४ मतदार मतदानाचा हक्क बजावून ठरविणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून १ हजार ३०६ मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी १ हजार २४३ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गत निवडणुकीचा आधार घेत सर्वाधिक व सर्वात कमी मतदान झालेल्या मतदान ७८ केंद्रांना अंतिसंवेदनशील मतदान केंद्र म्हणून जादा सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
४४ - आर्वी मतदार संघात १५ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. यामध्ये आठ राजकीय पक्ष आणि सात अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांचे भवितव्य २ लाख ४८ हजार ५५१ मतदार ठरविणार आहेत.
४५- देवळी मतदार संघात १० राजकीय पक्ष आणि नऊ अपक्ष असे एकूण १९ उमेदवार रिंगणात आहेत. २ लाख ४७ हजार ८७९ मतदार या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणार आहेत.
४६-हिंगणघाट विधानसभा मतदार संघात १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये नऊ पक्षीय आणि पाच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहेत. २ लाख ६० हजार ७०६ मतदार उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणार आहेत.
४७ - वर्धा विधानसभा मतदार संघात सर्वाधिक २१ उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहे. यामध्ये १४ उमेदवार राजकीय पक्षाच्या तिकीटवर लढत असून सात उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहे. २ लाख ८३ हजार १०८ मतदार या उमेदवारांचे राजकीय भवितव्य आपल्या मतांतून ठरविणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)