७० शेतकऱ्यांना योजनेच्या लाभाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:00:44+5:30

आर्वी उपविभागांतर्गत धडक सिंचन विहीर योजनेत ७०० विहीरी मंजूर आहेत. त्यापैकी २५० विहीरींच्या कामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यावर संबंधित अभियंत्याने दिलेल्या ले-आऊट नुसार शेतकऱ्यांनी कामाला सुरूवात केली आहे. या योजनेसाठी आर्वी उपविभागासाठी १ कोटी २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु, पंचायत समितीकडून अजूनही ७० लाभार्थ्यांना देयक देण्यात आलेले नाही.

70 farmers waiting for the benefits of the scheme | ७० शेतकऱ्यांना योजनेच्या लाभाची प्रतीक्षा

७० शेतकऱ्यांना योजनेच्या लाभाची प्रतीक्षा

googlenewsNext



शेतकऱ्यांच्या अडचणीत भर : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : हवालदील शेतकºयांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने धडक सिंचन योजना कार्यान्वित केली. परंतु, तब्बल ७० शेतकºयांना प्रत्यक्षक काम सुरू करून अद्याप योजनेची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. इतकेच नव्हे तर आर्वी पंचायत समिती प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
आर्वी उपविभागांतर्गत धडक सिंचन विहीर योजनेत ७०० विहीरी मंजूर आहेत. त्यापैकी २५० विहीरींच्या कामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यावर संबंधित अभियंत्याने दिलेल्या ले-आऊट नुसार शेतकऱ्यांनी कामाला सुरूवात केली आहे. या योजनेसाठी आर्वी उपविभागासाठी १ कोटी २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु, पंचायत समितीकडून अजूनही ७० लाभार्थ्यांना देयक देण्यात आलेले नाही. पंचायत समितीला हा निधीच प्राप्त न झाल्याचे सांगण्यात येत आहे. देयक थकल्याने काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी राखून ठेवलेले पैसे तसेच काहींनी उसनवारी पैसे काढून आतापर्यंतचे बांधकाम केले आहे. कोरडवाहू शेतजमीन सिंचनाखाली येईल या आशेने होते नव्हते ते पैसे शेतकऱ्यांनी विहीर खोदण्यासाठी खर्च केले. पण हे नवीन संकट उभे झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. येत्या काही दिवसांनी पावसाचे आगमण होईल. त्यानंतर हे बांधकाम ठप्प पडण्याची शक्यता आहे. शिवाय झालेले खोदकामही खसण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आहे.

Web Title: 70 farmers waiting for the benefits of the scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.