७२ वर्षांत १६ जणांनी भूषविले सरपंचपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 10:30 PM2019-06-06T22:30:20+5:302019-06-06T22:30:44+5:30

तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोराड ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जूनला होत आहे. ७२ वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहणाऱ्या गावाने १६ सरपंच दिले, जिल्हा परिषदेचे सभागृह गाजविले. या निवडणुकीत थेट सरपंच निवडल्या जाणार असल्याने ही निवडणूक विविध मुद्यांवर गाजण्याची शक्यता आहे.

In 72 years, 16 people have been elected as Sarpanchalpad | ७२ वर्षांत १६ जणांनी भूषविले सरपंचपद

७२ वर्षांत १६ जणांनी भूषविले सरपंचपद

Next
ठळक मुद्देजिल्ह्याच्या राजकारणात होता घोराडचा दबदबा : यावेळच्या निवडणुकीत तिहेरी सामना

विजय माहुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोराड ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जूनला होत आहे. ७२ वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहणाऱ्या गावाने १६ सरपंच दिले, जिल्हा परिषदेचे सभागृह गाजविले. या निवडणुकीत थेट सरपंच निवडल्या जाणार असल्याने ही निवडणूक विविध मुद्यांवर गाजण्याची शक्यता आहे.
२७ डिसेंबर १९४७ ला घोराड ग्रामपंचायत अस्तित्वात आली. शासन नियुक्त सरपंच म्हणून नारायण भिवाजी वाघे यांनी पदभार सांभाळला. सलग १३ वर्षे ते सरपंच होते. तर सर्वाधिक १४ वर्षे शंकर विठोबाजी खोपडे यांनी सरपंचपद भूषविले. १६ सरपंचात २००४ ते २०१९ या कालावधीत सलग तीन महिलांना सरपंचपदाचा मान मिळाला. तर आता चौथ्यांदाही महिलाकरिता सरपंचपद राखीव असल्याने घोराडच्या १७ व्या सरपंच कोण यासाठी मतदार २३ जूनला मतदान करणार आहे.
शंकरराव खोपडे यांचा १९६६-१९७८ या कालावधीत सरपंच असताना तालुक्यात पहिली नळयोजना गावात आणण्यात सिंहाचा वाटा आहे. गावाच्या विकासातील हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अधिकाअधिक काळ गावावर खोपडे गटाचा वरचष्मा राहिला आहे.
१९६१ ते १९७८ सलग १७ वर्षांची सत्ता १९७८ ला खोपडे गटाच्या हातून विरोधकांनी हिसकावून घेतली व अशोक केशवराव तेलरांधे हे सरपंच झाले. मात्र, पुन्हा ५ वर्षांतच १९८४ ला मतदारांनी खोपडे गटाच्या हातात सत्ता दिली. तर १९८९ ला झालेल्या निवडणुकीत जनतेने विरोधकांना कौल देत देवराव नथ्थुजी राऊत (पाटील) गटाची सत्ता आली. पण, सरपंच पदासाठी दुफळी निर्माण झाल्याने खोपडे गटाने सहकार्याचा हात देत विरोधी गटातील ४ सदस्य आपल्याकडे आणत बाबाराव सुरकार यांची सरपंचपदी निवड केली. येथूनच घोराडचे राजकारण बदलले. १९९४ ते ९९ मध्ये खोपडे गटाचे दोन गट झाले आणि वसंतराव तेलरांधे सरपंच झाले. १९९९ मधील निवडणुकीत गोपाळराव माहुरे सरपंचपदी निवडून आले व २००४ पर्यंत पुन्हा खोपडे गटाची सत्ता राहिली. २००४-०९ जयस्वाल गटाकडे, २००९ ते २०१४ मध्ये जयस्वाल गटाचा पराभव करीत गावातील सर्वपक्षीय गटाची सत्ता आली.
२०१४ पासून रणनवरे गटाची सत्ता आहे. तर २०१९ मध्ये सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी पाहता रणनवरे, जयस्वाल व आमदार गट असा तिहेरी सामना होत असल्याने मतदार कोणत्या गटाला झुकते माप देतात, हे २३ जूनला होणाऱ्या मतदारानंतरच कळणार आहे.

सरपंचपदाची हॅट्ट्रिक
नारायणराव वाघे, दादाजी ढोले, श्यामराव बालपांडे, शंकरराव खोपडे, अशोक तेलरांधे, बाबाराव सुरकार, देवराव राऊत, रमेश राऊत, वसंत तेलरांधे, गोपाळ माहुरे, तारा तेलरांधे, मंदा तडस, ज्योती घंगारे, यात शंकरराव खोपडे तीनवेळा तर दादाजी ढोले यांनी दोनवेळा सरपंचपद भूषविले.

Web Title: In 72 years, 16 people have been elected as Sarpanchalpad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.