७.२५० किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 09:39 PM2018-09-19T21:39:11+5:302018-09-19T21:39:26+5:30
खात्रीदायक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून ७.२५० किलो गांजा जप्त केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकाला अटक केली असून एका आरोपीने यशस्वीरीत्या पळ काढला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खात्रीदायक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून ७.२५० किलो गांजा जप्त केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकाला अटक केली असून एका आरोपीने यशस्वीरीत्या पळ काढला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रानुसार, सलीम पठान नामक इसम हा त्याच्या साथीदारासोबत गांजा आणत असल्याची तसेच हे दोन्ही आरोपी सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून वर्धा शहरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर माहिती प्राप्त होताच पोलिसांनी महिलाश्रम भागातील सुशील हिंम्मतसिगका शाळेजवळ सापळा रचला. यावेळी दोन संशयित इसम येत असल्याने पोलिसांनीही आपल्या हालचालींना वेग दिला. दरम्यान पोलीस पुढे असल्याचे लक्षात येताच दोघांपैकी एकाने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. तर एक जण पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेख सरताज शेख आलम (४३) याच्याकडून एका स्कूल बॅगमधील ७२ हजार ५०० रुपये किंमतीचा ७ किलो २५० ग्रॅम जप्त केला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शेख सरताज शेख आलम रा. वर्धा व सलीम पठाण रा. अमरावती या दोघांविरुद्ध एन.डी.पी.एस. एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, प्रदीप देशमुख, प्रमोद जांभूळकर, गिरीश कोरडे, हितेंद्र परतेकी, यशवंत गोल्हर, विकास अवचट, संघसेन कांबळे, रितेश शर्मा आदींनी केली.