१०० पैकी ७५ जणांना पंडूची लागण
By admin | Published: April 5, 2015 02:06 AM2015-04-05T02:06:32+5:302015-04-05T02:06:32+5:30
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेत ७५ टक्के नागरिकांच्या रक्तातील लाल पेशी कमी झाल्यामुळे त्यांना पंडूरोगाची (अॅनिमिया) लागण झाल्याचे समोर आले आहे.
वर्धा : जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेत ७५ टक्के नागरिकांच्या रक्तातील लाल पेशी कमी झाल्यामुळे त्यांना पंडूरोगाची (अॅनिमिया) लागण झाल्याचे समोर आले आहे. यात गर्भवती महिला अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. या आजारावर औषधोपचार असला तरी काळजी घेतल्यास त्यावर आळा बसविणे शक्य असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
या आजाराचे प्रमाण गर्भवती महिलांमतध्ये अधिक असल्याचे दिसून आले आहे. गर्भवती महिलांना या आजाराची लागण झाल्यास आईचे आरोग्य धोक्यात येऊन बाळाची वाढ खुंटते. अॅनिमिया टाळण्यासाठी गरोदरपणात पोष्टीक, सकस आणि समतोल आहार घेण्याची गरज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास पंडूरोग होतो. वर्धा जिल्ह्यातील ७५ टक्क्यापेक्षा जास्त नागरिकांना लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया झाल्याचे समोर आले आहे. यात सुमारे ४८ ते ५० टक्क्याच्या वर गर्भवती महिलांचा समावेश आहे. अॅनिमिया हा विकार रक्ताल्पता, पंडूरोग, रक्त क्षीणता, अरक्तता या नावानेसुद्धा ओळखल्या जातो. या विकारामध्ये रक्तातील तांबड्या पेशीची संख्या कमी होते. हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते. याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होतो. यावर औषधोपचार असला आरोग्याविषय खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या आजाराकडे दुर्लक्ष झाल्यास विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)