वन्यजीवांसाठी बोर व्याघ्रप्रकल्पात ७५ पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 10:05 PM2019-04-10T22:05:11+5:302019-04-10T22:05:38+5:30

बोर व्याघ्रप्रकल्पात वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांची उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी या उद्देशाने सदर प्रकल्पात एकूण ७५ कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी २८ पाणवठ्यांमध्ये सौरऊर्जेचा वापर करून तर उर्वरित पाणवठ्यांमध्ये चार टँकरद्वारे पाणी भरले जात आहे.

75 waterfalls of the Bore tiger reserve for wildlife | वन्यजीवांसाठी बोर व्याघ्रप्रकल्पात ७५ पाणवठे

वन्यजीवांसाठी बोर व्याघ्रप्रकल्पात ७५ पाणवठे

googlenewsNext
ठळक मुद्दे२८ ठिकाणी सौरऊर्जेचा वापर करून, तर उर्वरित ठिकाणी टँकरने होतो पाणीपुरवठा

रितेश वालदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरधरण : बोर व्याघ्रप्रकल्पात वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांची उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी या उद्देशाने सदर प्रकल्पात एकूण ७५ कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी २८ पाणवठ्यांमध्ये सौरऊर्जेचा वापर करून तर उर्वरित पाणवठ्यांमध्ये चार टँकरद्वारे पाणी भरले जात आहे. जंगलातच पाणी मिळत असल्याने बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांची पाण्यासाठीची होणारी भटकंती थांबली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ८१२.३२ हेक्टर क्षेत्रात तसेच १३८.१२ चौरस किमीमध्ये बोर व्याघ्र प्रकल्प पसरलेला आहे. यात बोर व न्युबोर असे दोन भाग आहेत. वर्धा व नागपूर जिल्ह्यात त्यांची सीमा आहे. राज्यातील जैविक विविधता आणि विपुलप्रमाणात वनसपदा यामुळे वन्यप्राण्यांची संख्याही येथे मोठी आहे. उन्हाळ्यात प्राण्यांना जंगल क्षेत्रातच पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने बोर व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी के. वाय. तळवेकर, जी. एफ. लुचे यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ७५ पाणवठ्यांची स्वच्छता करून त्यात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यापैकी तीन पाणवठ्यात नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून, २८ पाणवठ्यांमध्ये सौरउर्जेचा वापर करून तर ४४ पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी भरले जात आहे. या सर्व पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी टाकले जात असल्याने संभाव्य मनुष्य व वन्य जीव संघर्ष टाळण्यास मदत होत आहे. पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्यासाठी तीन शासकीय तर एक खासगी टँकरचा वापर केल्या जात आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वात छोटा व्याघ्रप्रकल्प म्हणून बोरची ओळख. परंतु, येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने, शिवाय सदर पाणवठ्यांवर अनेक वन्यप्रेमींसह पर्यटकांना सध्या वन्यप्राण्यांचे सहज दर्शन होत आहे.

वन्यप्राण्यांसह पक्ष्यांनाही आधार
१३८.३२ चौरस किमी परिसरात पसरलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्याना सदर पाणवठे आधार देणारे ठरत आहे. बोर व्याघ्र मध्ये चितळ, सांबर, अस्वल, चिकारा, चौसिगा, रानकुत्रे, निलगाय, रानडुकरे, यासह वाघ, बिबट आदी वन्य प्राणी आहेत. सदर वन्यप्राण्यासोबत व्याघ्र प्रकल्पातील विविध प्रजातींच्या पक्ष्यांसाठीही हे पाणवठे फायद्याचे ठरत आहे.

जंगल सफारी करणाऱ्यांच्या संख्येत होतेय दिवसेंदिवस वाढ
बोर व्याघ्र प्रकल्पातील जंगल क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या अधिवासाजवळच पाणवठ्यांद्वारे पाणी उपलब्ध करून दिल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वन्य प्राण्यांची भटकंती थांबली आहे. असे असले तरी या व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी येणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

१९ पाणवठे वाढविले
बोर व्याघ्र प्रकल्पात २०१८ मध्ये ५६ पाणवठे होते. तर यंदा पाण्याची कमतरता भासत असल्याने आणि जंगलातच वन्य प्राण्यांना पाणी मिळावे या उद्देशाने १९ नवीन पाणवठे तयार करण्यात आले आहे. परिणामी, सध्या पाणवठ्यांची संख्या ७५ झाली आहे.

Web Title: 75 waterfalls of the Bore tiger reserve for wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.