७९ वर्षीय जानरावांनी कमावली १०५ पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 09:57 PM2019-02-26T21:57:15+5:302019-02-26T21:57:44+5:30
महाराष्ट्रासह अन्य राज्य आणि देशात धाव स्पर्धेत सहभागी होत वयाच्या ७९ व्या वर्षी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी मूळचे देवळी तालुक्यातील बाभूळगाव (खोसे) येथील रहिवासी जानराव खुशाल लोणकर यांनी १०५ पदकांची कमाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्रासह अन्य राज्य आणि देशात धाव स्पर्धेत सहभागी होत वयाच्या ७९ व्या वर्षी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी मूळचे देवळी तालुक्यातील बाभूळगाव (खोसे) येथील रहिवासी जानराव खुशाल लोणकर यांनी १०५ पदकांची कमाई केली. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वासी (मुंबई) येथे माजी पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
मुंबई येथे स्वामी विवेकानंद पिस मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांत जानराव लोणकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करीत पदक मिळविले. या स्पर्धेत पाच हजार स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच नाशिक येथे पोलीस मॅरेशॉनमध्ये लोणकर यांनी सहभाग नोंदवत ३ किलोमीटर अंतर १९ मिनिटात पूर्ण केले. या स्पर्धेत ७९ वर्षे वयोगटात १५ स्पर्धक सहभागी झाले होते. या दोन्ही स्पर्धांसह आजपावेतो त्यांनी १०४ पदकांची कमाई केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात माजी पोलीस महासंचालक ध. ना. जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.