आठ लाखांचा दारूसाठा जप्त
By admin | Published: July 16, 2016 02:27 AM2016-07-16T02:27:20+5:302016-07-16T02:27:20+5:30
पांढुर्णा, मध्यप्रदेश येथून जिल्ह्यात दारूची तस्करी होते असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याआधारे पोलिसांनी सापळ रचून केलेल्या ..
मध्यप्रदेशातून तस्करी : तिघांवर गुन्हे दाखल
वर्धा : पांढुर्णा, मध्यप्रदेश येथून जिल्ह्यात दारूची तस्करी होते असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याआधारे पोलिसांनी सापळ रचून केलेल्या कारवाईत वाहनासह ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंदी (मेघे) मार्गे पोद्दार बगीचा, वर्धा येथे तीन चाकी मालवाहू क्रमांक एमएच ३२ क्यू ४५१४ ने देशी-विदेशी दारूचा साठा विक्रीकरिता येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. तसेच पेट्रोलींगकरिता एक कार क्र. एमएच ३२ एक्स ८४२० ही देखील आहे. या आधारे सिंदी(मेघे) येथे सापळा रचण्यात आला. दरम्यान समोरून एक कार व मालवाहु वाहन येत असल्याचे पोलीस पथकाला दिसले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिला असता सदर वाहन थांबविले. वाहनाची झडती घेतली असता यात देशी व विदेशी दारूच्या १८० मिलीच्या १ हजार ८६८ शिश्या आढळल्या. तर ७५० मिलिच्या ८४ बाटली आढळून आल्या. यात मालवाहक क्र. एमएच ३२ क्यू ४५१४, व कार क्र. एमएच ३२ एक्स ८४२० असे एकूण ७ लाख ५० हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी शंकर किसनचंद दणानी (३८) रा. पोद्दार बगीचा, वर्धा, जगदीश नंदलाल प्रजापती (३२) रा. सिंदी (मेघे), वर्धा, लालू जयस्वाल, रा. पांढुर्णा जि. छिंदवाडा यांच्याविरूद्ध रामनगर पोलीस ठाण्यात मुदाका कलम ६५ (अ)(ई), ७७ (अ), ८२,८३ अन्वये गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनात पराग पोटे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस पथक नामदेव किटे, दीपक जाधव, वैभव कट्टोजवार हरिदास काकड, अमित शुक्ला यांनी केली.(स्थानिक प्रतिनिधी)