बसच्या मागच्या चाकाचे 8 नट्स निघून अपघात; शेगांवमध्ये मोठी दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 03:30 PM2017-10-10T15:30:16+5:302017-10-10T15:30:30+5:30
हिंगणघाटमध्ये मोठी दुर्घटना होता होता टळली आहे.
हिंगणघाट - हिंगणघाटमध्ये मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. सकाळी स्थानिक आगारातून निघालेल्या बसच्या मागची मागची दोन्हीही चाक निघाल्याने हा अपघात झाला असता. पण ही घटना टळली. सकाळी साडेआठ वाजता आगारातून बस सुटली होती. बसच्या मागील दोन्हीही चाकं निघाल्याने जवळपास 50फुट बस फरफटत जावुन थांबली. सुदैवाने प्रवाश्यांचा जीव थोडक्यात वाचला आहे. पण पावसामुळे प्रवाशांचे बराच वेळ अतोनात हाल झाले.
सकाळी तुरळक पावसात हिंगणघाट आगराची MH 20 D 7831चिमूर बस सकाळी 8.30 वा. हिंगणघाट स्थानकावरुन सुटली. परंतु दररोज सकाळी 7.15 ला सुटणारी ब्रम्हपुरी बस नेहमी प्रमाणे आजही वेळेवर सुटली नाही . ती प्लॅटफार्म वर उभीच असल्याने चिमूर बसमध्ये प्रचंड गर्दी होती. ही बस सावली वाघ, मार्गे नंदोरी वरुन चिमूरकडे जात असतांना नंदोरी जवळच्या शेगांव (गोटाडे) परिसरात सकाळी 9.15वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. या धावत्या बसच्या डावीकडील मागचे दोन्ही चाके निघाल्याने जवळपास 50फुट बस फरफटत जावुन थांबली. यावेळी बस मधे जवळपास 50 प्रवाशी असावेत. या बसच्या चाकाची नट निघाल्याने अपघात झाल्याचे एस टि प्रशासना कडून माहिती मिळाली. सुदैवाने प्रवाश्यांचा जिव बचावला.
बस स्थानकात बस येण्याच्या आधी बसच्या सर्व भागाची तपासणी हिंगणघाट आगरात करण्यात येते. त्याप्रमाणे स्थानकावर बस येवून चिमूर प्रवासासाठी निघाली. पण या बसच्या मागच्या चाकाची सर्व च्या सर्व 8 नट निघुन खाली पडली त्यामुळे दोन्ही टायर चाके बाहेर निघाली. बस च्या चाकाची सर्व नट निघाले त्यामुळे आगरातील पूर्व तपासणी बाबत संशय निर्माण होत असुन चाकाची नट सैल असणे हा कोणाचा खोडसाळ पणा किंवा घातपाताचा प्रकार तर नाही याची खोलवर चौकशी करण्याची मागणी बसमधील प्रवाशानी केली आहे.
बसची पूर्व तपासणी आगारात होते यासंबधी चौकशी करुण दोषी वर कारवाई करण्यात येईन. तसेच चालक वाहक आवश्यक प्रमाणात नसल्याने कांही बस विलंबाने धावते.
संजय घुसे, आगार प्रमुख,हिंगणघाट