८०० गवंडी कामगारांची आरोग्य तपासणी
By admin | Published: June 13, 2017 01:12 AM2017-06-13T01:12:49+5:302017-06-13T01:12:49+5:30
गवंडी बांधकाम मजदूर युनियन यांच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ८०० गवंडी कामगारांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.
आरोग्यविषयक मार्गदर्शन : गवंडी बांधकाम मजदूर युनियनचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गवंडी बांधकाम मजदूर युनियन यांच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ८०० गवंडी कामगारांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.
गवंडी कामगारांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी याकरिता तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात जिल्ह्यातील गवंडी कामगार उपस्थित होते. यानंतर आरोग्य सुदृढ राखण्याकरिता कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन संघटनेचे राज्य सरचिटणीस खैरे, सुधीर पांगुळ, विरु पांडे, प्रशांत रामटेके व संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी तज्ज्ञ चमूने आरोग्य तपासणी केली.
यावेळी खैरे यांनी संघटनेच्या या कार्याचे महत्त्व विशद केले. तर सुधीर पांगुळ यांनी गवंडी कामगारांसाठी याप्रकारच्या शिबिराची गरज असल्याचे मत व्यक्त केले. धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे या कामगारांना शक्य नसल्याने हा उपक्रम आवश्यक असल्याचे सांगितले. शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहचविण्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संघटनेचे अध्यक्ष प्रशांत रामटेके यांनी देखील मार्गदर्शन केले.
संघटनेचे सचिव संतोष सेलूकर, अनिल इंगळे, शेख नसीर, विनोद पिंपळकर, गजानन खोब्रागडे, रविंद्र लांबट, ज्ञानेश्वर झिलपे, दिलीप रहांगडाले, यशवंत मानेश्वर, सुनील मेश्राम, बंडु फुलझेले, चरणदास आगलावे, प्रमोद उरकुडे, विठ्ठल रोंघे, भानुदास थुल व पदाधिकाऱ्यांनी शिबिराच्या आयोजनाकरिता सहकार्य केले.