८,४०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:34 AM2018-03-13T00:34:00+5:302018-03-13T00:34:00+5:30
आर्वी उपसा सिंचन योजनेद्वारे आर्वी तालुक्यातील ६१ गावातील व देवळी तालुक्यातील ४ गावातील ८४०० हेक्टर जमीन ओलीताखाली येईल, अशी माहिती लोअर वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रब्बेवार यांनी दिली.
आॅनलाईन लोकमत
रोहणा : आर्वी उपसा सिंचन योजनेद्वारे आर्वी तालुक्यातील ६१ गावातील व देवळी तालुक्यातील ४ गावातील ८४०० हेक्टर जमीन ओलीताखाली येईल, अशी माहिती लोअर वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रब्बेवार यांनी दिली.
परिसरातील शेतकºयांसाठी संजीवनी ठरणारा आर्वी उपसा सिंचन योजनेची माहिती शेतकºयांना मिळावी या हेतूने येथील ग्रा.पं. कार्यालय व विविध कार्यकारी क्षेत्र संस्थेच्यावतीने विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
सिंचन क्षेत्रात ठिंबक सिंचन द्वारे पाणी पसरविले जाणार आहे. त्याचे नियंत्रण विशिष्ट क्षेत्रापूरते मर्यादीत केल्या जावून पाण्याचा दाब संरक्षित करणार असल्याचे यावेळी उपविभागीय अभियंता हासे यांनी सांगितले. यावेळी ठिंबक सिंचन व तुषार सिंचन याबाबत कार्यवाही सबसीडी, क्षेत्राचे प्रमाण आदी विषयी माहिती पावळ, देशमुख, भेले यांनी दिली. कार्यक्रमाला सरपंच सुनील वाघ, सोसायटी अध्यक्ष भीमराव कुºहाडे, प्रगतीशिल शेतकरी अशोक कुºहाडे, शिरीष वाघ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर योजना दोन वर्षात पूर्णत्वास नेण्याचा मानस अधिकाºयांनी यावेळी व्यक्त केला. यात ५५ टक्के शासन अनुदान व ४५ टक्के शेतकरी हिस्सा राहणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी हजर होते.