वर्ध्यामध्ये ८९ हजारांचा गांजा जप्त, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 01:15 PM2019-05-02T13:15:16+5:302019-05-02T13:17:52+5:30
गोपनीय माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी कारवाई करून एकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी ८९ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेत त्याला अटक करण्यात आली आहे.
वर्धा - गोपनीय माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी कारवाई करून एकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी ८९ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेत त्याला अटक करण्यात आली आहे. पुरुषोत्तम देविदास गुडदे (४०) रा. वाशीम, असे आरोपीचे नाव आहे.
वर्धा मार्गे गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी वर्धा बस स्थानक परिसरात सापळा रचून संशयास्पद हालचाली करीत असलेल्या एकाला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील साहित्याची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. पोलिसांनी सदर प्रकरणी आरोपी पुरुषोत्तम गुडदे याला ताब्यात घेत त्याच्याकडून ८.९५० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पपीन रामटेके, पोहवा सतीश वैरागडे, सचिन देवडे, मंगेश झामरे, ढोणेश्वर निमजे, नितेश बावणे, रामेश्वर नागरे, आकाश कांबळे, राजकिशोर मिश्रा यांनी केली.