शांतता व सुव्यस्थेसाठी ९० जण स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:20 AM2019-03-23T00:20:21+5:302019-03-23T00:20:52+5:30

जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींची निवडणूक तसेच होळी या सणादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने कलम ६८ अंतर्गत तब्बल ९० जणांना ताब्यात घेऊन त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन त्यावर प्रभावी अंमलबजावणी केली.

90 people are detained for peace and convenience | शांतता व सुव्यस्थेसाठी ९० जण स्थानबद्ध

शांतता व सुव्यस्थेसाठी ९० जण स्थानबद्ध

Next
ठळक मुद्देकलम ६८ अंतर्गत कोंम्बिग : पोलीस विभागाची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींची निवडणूक तसेच होळी या सणादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने कलम ६८ अंतर्गत तब्बल ९० जणांना ताब्यात घेऊन त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन त्यावर प्रभावी अंमलबजावणी केली. ही मोहीम २४ मार्च रोजीपर्यंत राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तसेच दारूविक्री, तस्करी आणि दारूनिर्मिती आदी गुन्हे दाखल असलेल्यांची यादीच पोलीस विभागाकडे आहे. यंदाची होळी ग्रामपंचायत आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान आल्याने या कालावधीत कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिल्या होत्या. त्याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून २० मार्चपासून विशेष मोहीम हाती घेऊन अवैध व्यवसाय करणारे व गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांना कलम ६८ अन्वये ताब्यात घेण्यासंबंधीची कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २१ मार्चला ही मोहीम प्रभावीपणे राबवून तब्बल ९० जणांना ताब्यात घेत त्यांना स्थानबद्ध केल्याचे सांगण्यात आले. यात पो.स्टे. वर्धा येथे ८, रामनगर ६, वडनेर ७, आष्टी ४, सावंगी (मेघे) ५, खरांगणा ६, सेवाग्राम २, कारंजा ४, पुलगाव १, तळेगाव १, सिंदी रेल्वे १३, सेलू ५, हिंगणघाट १२, समुद्रपूर ४, दहेगाव ३, देवळी ४ व गिरड पोलीस ठाण्यातील ५ जणांचा समावेश आहे.

रविवारपर्यंत सुरू राहणार मोहीम
बुधवार २० मार्च पासून सुरू करण्यात आलेली ही मोहीम रविवार २४ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. कलम ६८ अन्वये ताब्यात घेण्यात आलेल्याला पोलीस जास्तीत जास्त २४ तास स्थानबद्ध करून ठेवत असून त्यांची कलम ६९ अन्वये सुटकाही करण्यात येते. विशेष म्हणजे ताब्यात असलेल्याला मतदान करण्यासाठी काही सवड दिली जात असते, असे सांगण्यात आले. २० मार्चलाही ही मोहीम राबवून काहींना ताब्यात घेत स्थानबद्ध करण्यात आले होते.

Web Title: 90 people are detained for peace and convenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस