वाहनासह ९.५१ लाखाचा दारुसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:45 PM2018-09-30T23:45:30+5:302018-09-30T23:45:53+5:30
मालवाहू वाहनातून भाजीपाल्याच्या आड दारुची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी नाकेबंदी करुन वाहनासह ९ लाख ५१ हजार रुपयाचा दारुसाठा जप्त केला. तसेच दोघांना अटकही करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पं.) : मालवाहू वाहनातून भाजीपाल्याच्या आड दारुची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी नाकेबंदी करुन वाहनासह ९ लाख ५१ हजार रुपयाचा दारुसाठा जप्त केला. तसेच दोघांना अटकही करण्यात आली आहे. ही कारवाई आज सकाळी चिस्तूर चौरस्त्यावर करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद तुलाराम आडे (२९) रा. कारला रोड, वर्धा व गजानन सिताराम मसराम (२८) रा. इंदिरानगर, आर्वी नाका, वर्धा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. अमरावतीकडून एमएच ४० एके २३७३ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या मालवाहू वाहनातून भाजीपाल्याच्या आड दारुची वाहतूक होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि राठोड यांना मिळाली. त्यांनी माहितीच्या आधारे त्यांनी निलेश पेटकर, सचिन साठे, चव्हाण, नितेश वाघमारे यांना सोबत तळेगाव मार्गावरील चिस्त ूर चौरस्यावर नाकेबंदी केली. काही वेळातच सांगतल्यानुसार तिवसाकडून वाहन तळेगावकडे येताना दिसले. लगेच त्या वाहनाला शिताफीने ताब्यात घेऊन तपासणी केली असता भाजीपाल्याच्या आड दारुसाठा आढळून आला. या वाहनात गोबींच्या पोत्याच्या मागे मोठ्या प्रमाणात देशी दारुसाठा होता. पोलिसांनी मालवाहूचा चालक विनोद आडे व सहकारी गजानन मसराम यांना अटक करण्यात आली. त्यांना देशी दारुच्या मालासंबंधाने परवाना विचारला असता परवाना नसल्याबाबत त्यांनी सांगितल्याने पंचनामा करुन कार्यवाही करण्यात आली. त्यांच्या वाहनातून ५ लाख ३२ हजार रुपयाचा दारुसाठा व ३ लाख ५० हजार रूपये किंमतेचे वाहन असा एकूण ९ लाख ५१ हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला. या आरोपींविरुध्द तळेगाव (श्या.पं.) पोलीस ठाण्यात कलम ६५ (अ)(इ), ७७ (अ), ८३ महाराष्ट दारुबंदी कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आणखी आरोपींनी नावे पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली, अपर पोलीस अधिकारी निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनात तपास ठाणेदार रवि राठोड, प्रदीपकुमार राठोड, करीम शेख, प्रमोद हरणखेडे, कैलास चौबे, निलेश पेटकर, सचिन साठे, आशिष चव्हाण, नितेश वाघमारे, मनिष मांडवरकर, विजय उईके यांनी केली आहे.