वर्धेत तीन केंद्रांवर ९९.३५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:17 PM2018-05-21T22:17:16+5:302018-05-21T22:24:14+5:30

विधान परिषदेच्या निवडणुकीत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघाकरिता वर्धेत सोमवारी मतदान झाले. यात वर्धा जिल्ह्यातील तीन केंद्रांवर तब्बल ९९.३५ टक्के मतदान झाले.

99.55 percent polling on three centers in Wardha | वर्धेत तीन केंद्रांवर ९९.३५ टक्के मतदान

वर्धेत तीन केंद्रांवर ९९.३५ टक्के मतदान

Next
ठळक मुद्देविधान परिषद निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विधान परिषदेच्या निवडणुकीत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघाकरिता वर्धेत सोमवारी मतदान झाले. यात वर्धा जिल्ह्यातील तीन केंद्रांवर तब्बल ९९.३५ टक्के मतदान झाले. वर्धेत प्रारंभी मतदानाबाबत निरूत्साह दिसला तरी दुपारपर्यंत जिल्ह्यात मतदानाचा चांगलाच आलेख चढल्याचे दिसून आले. मतदानादरम्यान कुठेही कोणता अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती आहे.
या तीन जिल्ह्यात आज झालेल्या निवडणुकीत ९९.७२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. याची मोजणी चंद्रपूर येथे २४ मे (गुरुवार) रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उभ्या असलेल्या चार उमेदावारांपैकी कोणाचे भाग्य यात साथ देईल हे मतमोजणीनंतरच कळणार आहे.
वर्धा जिल्ह्यात वर्धा, आर्वी व हिंगणघाट येथे मतदान केंद्र होते. जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीकरिता ३०८ मतदारांना मतदान करावयाचे होते. यात १५३ महिला आणि १५४ पुरूष मतदार होते. त्यांना मतदान केंद्रावर आणण्याकरिता सकाळपासूनच विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यरत होते. वर्धा येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच आमदार, खासदार, नगराध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्षांची उपस्थिती असल्याचे दिसून आले.
सायंकाळपर्यंत वर्धेत १०० टक्के मतदान झाले. वर्धा केंद्रावर १५१ मतदार होते. यात ७४ पुरूष आणि ७७ महिलांचा समावेश आहे. या सर्वांनीच आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. हिंगणघाट मतदान केंद्रावर एकूण ७७ मतदारांना मतदान करावयाचे होते. यात ४२ पुरूष आणि ३५ महिलांचा समावेश आहे. येथे शंभर टक्के महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर ९७.६२ टक्के पुरूष मतदारांनी मतदान केले. आर्वी केंद्रावर ८९ मतदारांना मतदान करावयाचे होते. येथे ३८ पुरूष आणि ४१ महिला मतदारांचा समावेश होता. येथे संपूर्ण मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे समोर आले.
यादी चुकली
शासनाने तयार केलल्या मतदार यादीत घोळ असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी वाढीव उमेदवार दिसले.
हिंगणघाटात एकाची अनुपस्थिती
हिंगणघाट मतदान केंद्रावर एका मतदाराने मतदान केले नाही. यामुळे तो कोण हे जाणून घेण्याकरिता सारेच उत्सूक आहेत. जिल्ह्यात सत्तेत असलेल्या की विरोधात असलेल्या पक्षाचा तो मतदार आहे, किंवा अपक्ष असलेला तो मतदार आहे या बाबत विविध चर्चा सुरू आहे.

Web Title: 99.55 percent polling on three centers in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.