दुर्दैवी घटना! बैल पोळ्याच्या दिवशीच शेतकरी पिता-पुत्राचा तलावात बुडून मृत्यू

By चैतन्य जोशी | Published: September 14, 2023 04:56 PM2023-09-14T16:56:20+5:302023-09-14T16:57:27+5:30

गुंजखेडा गावात शोककळा : हिवरा शिवारातील घटना

A farmer father and son drowned in the lake in hivara shivara | दुर्दैवी घटना! बैल पोळ्याच्या दिवशीच शेतकरी पिता-पुत्राचा तलावात बुडून मृत्यू

दुर्दैवी घटना! बैल पोळ्याच्या दिवशीच शेतकरी पिता-पुत्राचा तलावात बुडून मृत्यू

googlenewsNext

विरुळ (आकाजी) (वर्धा) : बैल पोळ्याचा सण असल्याने गावात सण साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू होती. मात्र, बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना १४ रोजी हिवरा परिसरात घडली. या घटनेने गुंजखेडा गावावर शोककळा पसरली आहे. राजू पुंडलिक राऊत (५३), चंद्रकांत राजू राऊत अशी मृ़तकांची नावे आहेत. 

प्राप्त माहितीनुसार, सर्वत्र पोळा सणाची तयारी सुरू होती. शेतकरी राजू राऊत यांचे शेत हिवरा शिवारात असल्याने राजू व त्यांचा मुलगा चंद्रकांत हे दोघेही लगतच असलेल्या तलावातील पाण्यात बैलांना धुण्यासाठी घेऊन गेले होते. बैल धुताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात गटांगळ्या घेत बुडाले. दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पसरताच गावात शोकमग्न वातावरण होते.

या घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मुलगा चंद्रकांत याचा मृतदेह तलावाबाहेर काढला असून वडील राजू यांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पुलगाव पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून पंचनामा सुरू आहे.

Web Title: A farmer father and son drowned in the lake in hivara shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.