मध्यरात्री गोठ्याला भीषण आग; चार जनावरांचा होरपळून मृत्यू, शेती साहित्य जळून खाक
By अभिनय खोपडे | Published: September 15, 2022 10:30 AM2022-09-15T10:30:42+5:302022-09-15T10:34:43+5:30
रेणकापूर येथील घटना; आग विझविताना दोघांना गंभीर दुखापत
समुद्रपूर ( वर्धा) : गोठ्याला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत चार जनावरांचा मृत्यू तर, एक बैल जखमी झाल्याची घटना घडली. तर, आग विझवताना दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
समुद्रपूर तालुक्यातील रेणकापूर येथील शेतकरी आत्माराम निखाडे यांच्या घराजवळ असलेल्या गोठ्याला गुरुवारी मध्यरात्री तीन वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटने आग लागल्याने गोठ्याला बांधून असलेल्या पाच जनावरांपैकी चार जनावरांचा जळून मृत्यू झाला तर, एक बैल गंभीर जखमी झाला. या आगीत गोठ्यामध्ये ठेवलेले शेती साहित्य जळून खाक झाले. गोठ्याला घर लागून असल्याने घरातील फ्रिज पंखा दिवान यांचे सुद्धा नुकसान झाले. या आगीत शेतकऱ्याचे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळतात गावातील नागरिकांनी घटनास्थळ धाव घेतली पण आगीने रौद्र रूप धारण केले होते घटनेची माहिती नगरसेवक दिनेश निखाडे यांनी नगरपंचायतला दिली नगरपंचायतने कर्मचारी श्रीकांत आगलावे, विजय सरोदे,यांनी पाणी टँकर घेऊन घटनास्थळावर दाखल झाले पण आग आटोक्यात येत नसल्याने हिंगणघाट येथील अग्निशामक दलाला बोलविण्यात आले अग्निशामक दलाने घटनास्थळावर पोहोचून आग आटोक्यात आणली.
या आगीत आग विझवतांनी शेतकरी आत्माराम निखाडे व मुलगा अशीच निकाळे यांना गंभीर दुखापत झाली घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला व समोरचा तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे