अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 06:05 PM2024-05-15T18:05:13+5:302024-05-15T18:05:48+5:30
Wardha : प्रतीक्षा दापूरकर आष्टी येथे कार्यकर्ता संवाद, प्रशिक्षण शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद.): अंधश्रद्धांचे पारंपरिक आणि आधुनिक प्रकार निर्माण झाले आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आजही आव्हानात्मक आहे. समाजाला अधिकाधिक वैज्ञानिक दृष्टिकोन दिल्यास अंधश्रद्धांमधून मुक्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षा प्रतीक्षा दापूरकर यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आष्टी शाखेने एकदिवसीय कार्यकर्ता संवाद, प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. यावेळी अंनिस वर्धा जिल्हा प्रशिक्षण विभागाच्या कार्यवाह माधुरी झाडे, हरिश पेटकर यांनी नव्याने कामात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना प्रशिक्षण दिले.
जुन्या पारंपरिक अंधश्रद्धा अजूनही समाजात आहेतच, पण अत्याधुनिक स्वरूपातील अंधश्रद्धाही लोकांच्या मनगुटीवर बसलेल्या आहेत. त्यामुळे बनला आहे. त्याच्या निर्मूलनासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनाची आवश्यकता, गरज अधोरेखित करून तो समाजात रूजविल्यास लोक तार्किक विचार करू लागतील आणि अंधश्रद्धांच्या आहारी जाणार नाहीत, असे मत हरिश पेटकर यांनी व्यक्त केले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामांमध्ये पुरुषांसोबतच महिलांचा अधिक सहभाग असल्यास अंधश्रद्धेतून महिलांचे होणारे शोषण, मानसिक आजारपण, नैराश्य, हिंसा अशा विविध समस्यांमधून सुटका होईल, असे मत डॉ. माधुरी झाडे यांनी व्यक्त केले.
यावेळी शाखा कार्याध्यक्ष प्रतीक्षा दापूरकर, मोरेश्वर गायकी, तसेच वरूड शाखेचे कार्याध्यक्ष शंतनू पांडव उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान अंधश्रद्धा म्हणजे काय? 'अंधश्रद्धेचे प्रकार परिणाम' यावर माधुरी झाडे यांनी विस्तृत मांडणी केली. संघटनेची कार्यपद्धती सांगितली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाची पंचसूत्री हरिश पेटकर यांनी सांगितली, प्रतीक्षा दापूरकर यांनी संतांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा वारसा याविषयी मांडणी केली. संत सुधारकांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा मोठा विचार वारसा असून, तो कृतिशील करण्याची गरज आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजमनात वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. याबद्दल अंनिसचे कौतुक केले आणि सर्वांचे आभार व्यक्त केले.
चमत्काराच्या प्रयोगाचे केले सादरीकरण
आधुनिक जमान्यातही चमत्का- रावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हातचलाखी करून चमत्काराचे प्रयोग दाखवून विविध कारणे समोर करून सर्व- सामान्यांत भीती घातली जाते. या हातचलाखीमागे केवळ आणि केवळ विज्ञान आहे. अशा चमत्काराच्या प्रयोगाचे सामूहिक सादरीकरण करून त्यामागील वैज्ञानिक कारणांचा उलगडा करण्यात आला, प्रशिक्षणार्थीनी समाज, शाळा, महाविद्याल- यांमध्ये विविध उपक्रम राबवून अंधश्रद्धा निर्मूलनात हातभार लावण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.