इस्माईलपूरच्या घाटातून रेती चोरणाऱ्यांना अभय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:50 PM2019-08-28T23:50:50+5:302019-08-28T23:51:13+5:30
गोदावरी रस्ता रेतीच्या जड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात दबाला आहे. या गावाच्या हद्दीतून ईस्माइलपूर रेतीघाट आहे. सदर घाटाचा लिलाव पुलगाव येथील गुप्ता नामक इसमाने घेतला. त्याने मुदत संपल्यानंतही विना परवाना उत्खनन करून रेतीची वाहतूक केली. ११ जुलै २०१९ ला खडकी येथील तलाठीने या घाटाची पाहणी केली. तेव्हा जेसीबी व बोटीने पाण्यातून रेतीचा उपसा सुरू होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : ईस्माईलपूरचा रेतीघाट बंद कॅमेºयाच्या सहाय्याने पोकलँड, बोटी लावून अक्षरश: पोखरून काढला. आतापर्यंत दोन कोटीच्यावर रेती काढून माफियाने कहर केला आहे. याप्रकरणी आष्टी तहसीलदारांनी रेतीघाट बंद करा असे पत्र वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले; पण या पत्राला खो देण्यात आला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्तांना गोदावरीच्या ग्रामस्थांनी लेखी तक्रार पाठविली आहे.
गोदावरी रस्ता रेतीच्या जड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात दबाला आहे. या गावाच्या हद्दीतून ईस्माइलपूर रेतीघाट आहे. सदर घाटाचा लिलाव पुलगाव येथील गुप्ता नामक इसमाने घेतला. त्याने मुदत संपल्यानंतही विना परवाना उत्खनन करून रेतीची वाहतूक केली. ११ जुलै २०१९ ला खडकी येथील तलाठीने या घाटाची पाहणी केली. तेव्हा जेसीबी व बोटीने पाण्यातून रेतीचा उपसा सुरू होता. अट क्र.१५ नुसार नदीपात्रात निश्चित केलेल्या वाळुघाटातून वाळूचे उत्खनन हाताने करावे लागेल असे असताना बोट व पोकलँडचा वापर करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रेतीघाट लिलावाधारक यांना मंजूर वाळुघाटाचे निश्चित केलेल्या क्षेत्राबाहेरील अमरावती जिल्ह्याचे हद्दीत उत्खनन करीत आहे. हे उत्खनन बोटीने व जेसीबीचा वापर करून केल्याचे महसूल विभागाच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून रिकामी बॉक्स असल्याचे दिसून आले.
रेतीघाटाचे सीमांकन खांब अजूनही लावलेले नाही. त्यामुळे अटी व शर्ती धाब्यावर बसविल्याने सदर वाळूघाट त्वरीत बंद करण्यात यावा, असे पत्र १६ जुलै २०१९ ला तहसीलदारांनी जिल्हाधिकारी यांना पाठविले; पण अजूनही घाटातून नियमडावलून उत्खनन केले जात आहे. या ठिकाणावरून दिवसाकाठी दीडशे गाड्या अमरावती जिल्ह्यात जात आहेत. धमकी देऊन सर्रास लूट केली जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत तातडीने योग्य कार्यवाही करावी अशी मागणी आहे.
पोखरले जात आहेत नाल्यांचेही पात्र
अवैध उत्खनन करणाºयांची मोठी टोळीत सध्या तालुक्यात सक्रिय झाली आहे. परंतु, त्यांच्या मनमर्जी कारभाराला आळा घालण्यासाठी पाहिजे तसे प्रभावी काम शासकीय अधिकाºयांकडून होत नसल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. तालुक्यातील नदी पात्रांसह मोठाल्या नाल्यांमधून हे उत्खनन माफिया वाळूची चोरी करीत असून तालुका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेण्याची मागणी आहे.
ईस्माइलपूर रेतीघाट बंद करण्याचे पत्र महिन्याभरापूर्वी शासनाला पाठविले आहे. घाट बंद करण्याचे निर्णय जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत आहे.
- आशीष वानखडे, तहसीलदार, आष्टी (शहीद).