अबब..! महिलेच्या पोटात १० किलो वजनाचा मांसाचा गोळा
By admin | Published: August 23, 2016 02:03 AM2016-08-23T02:03:34+5:302016-08-23T02:03:34+5:30
पोटात सतत दुखत असल्याच्या कारणाने दाखल झालेल्या महिलेची तपासणी केली असता तिच्या पोटात
वर्धा : पोटात सतत दुखत असल्याच्या कारणाने दाखल झालेल्या महिलेची तपासणी केली असता तिच्या पोटात मांसाचा गोळा तयार झाल्याचे समोर आले. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नसल्याने सदर महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली. यावेळी तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून मांसाचा गोळा काढण्यात आला. या गोळ्याचे वजन केले असता ते १० किलो भरल्याने सारेच अवाक् झाले.
शासकीय रुग्णालय म्हणताच अनेकांकडून तोंड वाकडे केले जाते. वर्धेत मात्र याच शासकीय रुग्णालयात अवघड शस्त्रक्रीया करून एका गरीबाचे प्राण वाचविल्याचे समोर आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातही रुग्णांचे प्राण वाचू शकते, असे कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने दाखवून दिले. आहे. सध्या वर्धा सामान्य रुग्णालय डॉ. कृष्णा शेंडे, डॉ. कपूर, डॉ. कपिल, डॉ. सालवे यांची टीम कार्यरत आहे. या चार डॉक्टरांच्या चमूने ही अवघड शस्त्रक्रीया केली.
आर्थिक बाजू कमकुवत असलेले रुग्णच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याचे दिसून आले आहे. याच परिस्थितीचा सामना करीत असलेली शेकापूर येथील निलिमा बोथरे नामक महिला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झाली होती.
सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यांच्या या चमूचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, अतिरिक्त शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. कळमकर यांनी मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी)
दुर्बिणीद्वारे दुसरी शस्त्रक्रिया
४याच काळात आर्वी येथील रुग्णालयात प्रसूतीच्या कारणाने दाखल झालेल्या ममता ठाकरे या महिलेवरही दुर्बिणीने शस्त्रक्रिया करून तिचेही या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राण वाचविले आहे. ममता हिच्या प्रेगनेंसी ट्यूब रूप्चर होऊन सुमारे दोन लिटर ब्लड पोटामध्ये जमा झाले व तिच्या जीवितास धाका निर्माण झाला. या स्थितीत तिला कुठे हलविणे शक्य नसल्याने डॉ. कृष्णा शेंडे व त्यांच्या टिमने शस्त्रक्रीया केल्यामुळे रुग्णाचे प्राण वाचु शकले. त्यांनी ही शसत्रक्रीया दुर्बिणीच्या सहायायाने केल्याचे सांगण्यात आले आहे.