जागा मुबलक; पण विद्यार्थी संख्या अल्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:00 AM2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:00:37+5:30
कोविड-१९ च्या प्रकोपामुळे यावर्षी दहावीचा निकाल चांगलाच लांबला होता. अखेर आठवड्याभरापूर्वी दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना भरमसाठी गुण प्राप्त झाले. यावर्षी जिल्ह्याचा निकाल तब्बल ९२.१० टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत २६.६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून १६ हजार ८७१ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेकरिता अर्ज केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या वाढत असल्याने जागाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. मात्र, उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्या तुलनेने कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील १३६ कनिष्ठ महाविद्यालयात विविध शाखेच्या २३ हजार ३०० जागा असताना यावर्षी १५ हजार ४१९ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल ७ हजार ८८१ जागांवर पाणी सोडावे लागणार आहेत.
कोविड-१९ च्या प्रकोपामुळे यावर्षी दहावीचा निकाल चांगलाच लांबला होता. अखेर आठवड्याभरापूर्वी दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना भरमसाठी गुण प्राप्त झाले. यावर्षी जिल्ह्याचा निकाल तब्बल ९२.१० टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत २६.६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून १६ हजार ८७१ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेकरिता अर्ज केले होते. त्यापैकी १६ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १५ हजार ४१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयात कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त अभ्यासक्रमाच्या २३ हजार ३०० जागा आहेत.
पण, उत्तीर्ण झालेल्यांची संख्या केवळ १५ हजार ४१९ आहेत. यापैकी बरेच विद्यार्थी एमसीव्हीसी व्होकेशनल, पॉलिटेक्निक, आयटीया किंवा इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार आहेत.
परिणामी यावर्षीही कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेश मिळविण्याची मोठी कसरत करावी लागणार आहेत. तरीही कनिष्ठ महाविद्यालयातील बऱ्याच जागा रिक्त राहणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहेत.
अशी आहे प्रवेश प्रक्रिया
दहावीचा निकाल लागला असून अद्याप नागपूर विभागीय मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका प्राप्त झाल्या नाहीत. पण, निकाल जाहीर झाल्यानंतर कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी व्होकेशनल, तंत्रनिकेतन यासह इतरही विभागाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. शासनाने यावर्षी अकरावीच्या प्रवेशाकरिता आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया 11३ँंे्रि२२्रङ्मल्ल.ङ्म१ॅ.्रल्ल या संकेतस्थळावर सुरु करण्यात आली आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता काही महाविद्यालयातही प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये ८० अनुदानित कनिष्ठ महाविद्यालये
जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये एकूण १३६ कनिष्ठ महाविद्यालये असून यामध्ये ८० कनिष्ठ महाविद्यालये अनुदानित आहे. तर २१ कनिष्ठ महाविद्यालये विना अनुदानित, ०८ कायम विनाअनुदानित आणि २७ कनिष्ठ महाविद्याये स्वयं अर्थसहाय्यित आहेत. सर्वाधिक ४१ कनिष्ठ महाविद्यालये एकट्या वर्धा तालुक्यात आहे. त्यानंतर हिंगणघाट तालुक्यात २३ तर देवळी तालुक्यामध्ये २१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. सर्वात कमी आष्टी आणि कारंजा तालुक्यात कनिष्ठ महाविद्यालये आहेत.
विज्ञान शाखेकडे कल
विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने प्रवेशासाठी जाती सवर्गनिहाय निकष लावण्यात आले आहे. यामध्ये एससी प्रवर्गाकरिता १३ टक्के, एसटी प्रवर्गाकरिता ७ टक्के, व्हीजेएनटीकरिता ११ टक्के (व्हीजे-अ ३ टक्के, एनटी-बी २.५० टक्के, एनटी-सी ३.५० टक्के, एनटी-डी २ टक्के), एसबीसी २ टक्के, ओबीसी १९ टक्के तर ओपनकरिता ४८ जागा आरक्षित करण्यात आल्या आहे. एमसीव्हीसी व्होकेशनलसाठीही हेच निकष लावण्यात आले आहे.