ग्रामीण भागाच्या विकासासाठी राजकारणात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 06:00 AM2019-10-01T06:00:00+5:302019-10-01T06:00:05+5:30
सहकार व शिक्षणमहर्षी बापूरावजी देशमुख यांनी ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था सुरू केल्यात. या माध्यमातून ग्रामीण भागात ज्ञानदानाचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. देशमुख परिवाराने कायम ग्रामीण भागाच्या उत्कर्षासाठी काम केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : सहकार व शिक्षणमहर्षी बापूरावजी देशमुख यांनी ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था सुरू केल्यात. या माध्यमातून ग्रामीण भागात ज्ञानदानाचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. देशमुख परिवाराने कायम ग्रामीण भागाच्या उत्कर्षासाठी काम केले. हाच ध्यास घेऊन समीर देशमुख राजकारणात आले आहेत. दाआजींचा वारसा पुढे चालविण्यासाठी त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक आपल्या सर्वांच्या आशीर्वीदाने लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समीर देशमुख यांच्या पत्नी प्रियांका देशमुख यांनी दिली.
देवळी तालुक्यातील चिंचाळा व भिडी येथील जनसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या भागात महिलांच्या अनेक समस्या आहेत. त्या जाणून घेण्यासाठी मी येथे आली आहे. महिलांच्या विकासासाठी निश्चितपणे भविष्यात काम केले जाईल.
देवळी, पुलगाव परिसरात फिरत असताना या भागात अनेक गावे विकासापासून अद्यापही वंचित आहेत, असे प्रकर्षाणे जाणवत आहे. त्या भागातील लोकप्रतिनिधींनी तळागाळातील गरीब माणसांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे हा भाग विकासापासून कोसोदूर गेला आहे, असेही त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले. समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सुटू शकतात. त्यामुळेच समीर यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे प्रियांका देशमुख यांनी सांगितले.