'समृद्धी’वर पुन्हा अपघात; महिला पोलीसाचा मृत्यू, तीन जण जखमी
By अभिनय खोपडे | Updated: May 1, 2023 16:15 IST2023-05-01T16:15:00+5:302023-05-01T16:15:24+5:30
सोमवारी दुपारची घटना, टोल नाक्याजवळ ट्रक उलटला

'समृद्धी’वर पुन्हा अपघात; महिला पोलीसाचा मृत्यू, तीन जण जखमी
अभिनय खोपडे, वर्धा : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका कायमच आहे. दोन दिवसांपूर्वी अपघात झाला. त्यात एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले होते. त्यानंतर आज सोमवारी एक वाजता टोल नाक्याजवळ ट्रक रस्त्याखाली उतरला.
हा ट्रक वेगात होता. नाक्याजवळ येत असताना अचानक वेग कमी करण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याचे सांगितल्या जाते. ट्रक उलटताच त्यातील बियरचे पूर्ण डब्बे फुटले. काचांचा खच पडला. घटना कळताच महामार्ग व सावंगी पोलिसांची चमू घटनास्थळी पोहोचली.