जनावरे नेणाऱ्या वाहनाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 09:17 PM2019-04-26T21:17:44+5:302019-04-26T21:19:39+5:30

कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाचे चाक निघून झालेल्या अपघतात दोन बैल गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मागाहून आलेल्या वाहनात बसून चालकाने पळ काढला. हा अपघात शुक्रवारी सकाळी ६ वाजतादरम्यान महामार्ग क्रमांक सहावरील टोलनाक्या नजिकच्या साई अमन ढाब्याजवळ झाला.

Accident in an animal vehicle | जनावरे नेणाऱ्या वाहनाला अपघात

जनावरे नेणाऱ्या वाहनाला अपघात

Next
ठळक मुद्देदोन बैल गंभीर : वाहन सोडून चालक फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाचे चाक निघून झालेल्या अपघतात दोन बैल गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मागाहून आलेल्या वाहनात बसून चालकाने पळ काढला. हा अपघात शुक्रवारी सकाळी ६ वाजतादरम्यान महामार्ग क्रमांक सहावरील टोलनाक्या नजिकच्या साई अमन ढाब्याजवळ झाला.
नागपूर येथून एम.एच.०९ पी.ए.१५६४ क्रमाकाच्या वाहनात ११ जनावरे कोंबून अमरावतीकडे कत्तलखान्यात नेली जात होती. दरम्यान कारंजा (घा.) नजिकच्या टोल नाक्याजवळी ढाब्यासमोर सकाळी सहा वाजताच्या सुमारास या वाहनाचे चाक निघाल्याने वाहन पलटी झाले. वाहनातून चालकाने कशीबशी सुटका करुन घेत मागाहून जनवारे भरुन येणारी दोन वाहने थांबविली. त्यातील एका वाहनात बसून चालकाने पळ काढला. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी हे दृश्य बघून पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार सुर्यवंशी यांनी घटनास्थळ गाठून वाहनातील जनावरांची सुखरुप सुटका केली. या वाहनात गाई आणि बैल निर्दयतेने कोबण्यात आले होते.
या अपघातात दोन बैल गंभीर जखमी झाले आहे. वाहनातील सर्व जनावरांना अमरावती जिल्ह्यातील सिद्धबाबा हनुमान गोरक्षण संस्था, केकतपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अपघातग्रस्त वाहनाचा चालक आणि इतर दोन वाहनासह त्याच्या चालकाचाही शोध पोलीस घेत आहे.


पोलीस सीसीटीव्ही तपासणार काय?
या मार्गाने रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जनावरांची अवैध वाहतूक होत असते. शुक्रवारी जनवारांची वाहतूक करणाºया अपघातग्रस्त वाहनासह आणखी दोन वाहने जनावरे भरुन जात असताना नागरिकांनी बघितले. त्यामुळे पोलिसांनी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेºयाची तपासणी केल्यास त्या दोन्ही वाहनांची माहिती मिळू शकते. पण, पोलीस या वाहनांचा शोध लावणार की नेहमीप्रमाणे तपासाला बग देईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Accident in an animal vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात