वर्धा जिल्ह्यात रेल्वे चालकाच्या सतर्कतेने टळली दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 03:14 PM2020-03-22T15:14:52+5:302020-03-22T15:15:13+5:30
रेल्वे धावत असताना, तिच्या एका बोगीचे ब्रेक जाम होऊन आग लागल्याचे दुसऱ्या एका रेल्वेच्या चालकाच्या ध्यानात आल्याने त्याने प्रसंगावधान राखून संभाव्य दुर्घटना टाळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: रेल्वे धावत असताना, तिच्या एका बोगीचे ब्रेक जाम होऊन आग लागल्याचे दुसऱ्या एका रेल्वेच्या चालकाच्या ध्यानात आल्याने त्याने प्रसंगावधान राखून संभाव्य दुर्घटना टाळली. ही घटना वर्धा जिल्ह्यातील सेलू रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी ११.३० च्या सुमारास घडली. तेलंगणा एक्सप्रेस ही गाडी या
रेल्वे स्थानकातून जात असताना बाजुला थांबलेल्या रेल्वेतील चालकाच्या लक्षात आले की, तेलंगणा एक्सप्रेसच्या एस-८ या बोगीच्या चाकांमधून ठिणग्या व धूर निघत आहे. या बोगीची चाके जाम झाल्याने तसे घडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने प्रसंगावधान राखत तात्काळ संबंधितांना याची कल्पना दिली व ही गाडी सेवाग्राम येथे रोखण्यात आली. येथे या गाडीतील तांत्रिक त्रुटी दूर करून ती दुपारी २.३० च्या सुमारास पुढे निघाली. या गाडीत पुन्हा काही अडचण येऊ नये यासाठी दोन तांत्रिक विभागाचे कर्मचारीही सोबत पाठवण्यात आले.