कार-ट्रॅव्हल्सचा अपघात; १२ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:27 PM2019-01-07T23:27:29+5:302019-01-07T23:28:07+5:30

वळण मार्गावर कारला भरधाव असलेल्या ट्रॅव्हल्सने धडक दिली. यात दोन्ही वाहनातील सुमारे १२ जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी वर्धा-नागपूर महामार्गावर महाबळा शिवारात झाला. अपघात होताच ट्रॅव्हल्स चालक व वाहन घटनास्थळावरून पसार झाला.

Accident of car-trips; 12 passengers injured | कार-ट्रॅव्हल्सचा अपघात; १२ प्रवासी जखमी

कार-ट्रॅव्हल्सचा अपघात; १२ प्रवासी जखमी

Next
ठळक मुद्देवर्धा-नागपूर मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : वळण मार्गावर कारला भरधाव असलेल्या ट्रॅव्हल्सने धडक दिली. यात दोन्ही वाहनातील सुमारे १२ जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी वर्धा-नागपूर महामार्गावर महाबळा शिवारात झाला. अपघात होताच ट्रॅव्हल्स चालक व वाहन घटनास्थळावरून पसार झाला.
प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ४० ए.सी. ३७४२ क्रमांकाची कार नागपूरच्या दिशेने जात होती. कार वळण रस्त्यावर आली असता मागाहून आलेल्या एम.एच. ३२ क्यू. ९८० क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने कारला जबर धडक दिली. यात कार मधील हेमराज सफट (४५), भास्कर लांबट (५०), अनुप मिस्कीन (२३), सुष्मा मिस्कीन (३३) सर्व रा. बुट्टीबोरी, चेतना ठाकरे (३२) रा. नागपूर हे जखमी झाले. तर ट्रॅव्हल्स मधील स्विटी घोडमारे (२३) रा. बुट्टीबोरी यांच्यासह सुमारे सात प्रवासी जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची सेलू पोलिसांनी नोंद घेतली असून नेहमीप्रमाणे सेलू पोलीस घटनास्थळी उशीरा पोहोचले, हे विशेष.
दुचाकीच्या अपघातात एक ठार
समुद्रपूर : तालुक्यातील जाम शिवारात जाम-समुद्रपूर मार्गावर प्लास्टो कंपनी समोर झालेल्या दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सायंकाळी ७ वाजता झाला. पवन लक्ष्मण पालेकर (२६) असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार, पवन पालेकर व त्याचा मित्र विजय अत्राम हे दोघे विना क्रमांकाच्या दुचाकीने जामकडून समुद्रपूरकडे जात होते. दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात पवन याचा जागीच मृत्यू झाला तर विजय आत्राम हा गंभीर जखमी झाला. विजयला सुरूवातीला समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली आहे.

Web Title: Accident of car-trips; 12 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.