लोंबलेल्या तारांमुळे अपघाताचा धोका
By admin | Published: October 4, 2014 11:31 PM2014-10-04T23:31:46+5:302014-10-04T23:31:46+5:30
येथील विद्युत खांबावरील वाहिन्या अनेक दिवसांपासून लोंबकळत असून धोका होण्याची संभावना आहे; परंतु याकडे विद्युत वितरण कंपनी नांदपूरचे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे.
टाकरखेड : येथील विद्युत खांबावरील वाहिन्या अनेक दिवसांपासून लोंबकळत असून धोका होण्याची संभावना आहे; परंतु याकडे विद्युत वितरण कंपनी नांदपूरचे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे.
गावातील विद्युत पुरवठ्याच्या अनेक खांबावरील तारा लोंबल्या असून गावातील अतकरे यांच्या घरासमोर व चक्कीच्या परिसरात अक्षरश: तारा खाली आल्या आहेत. या तारांना कुणाचा स्पर्श झाल्यास धोका उद्भवन्याची दाट शक्यता आहे. याची माहिती वीज वितरण कंपनीला दिली नाही असे ही. मात्र त्यांच्याकडून मात्र अद्यापही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे कंपनी कुणाचा जीव जाण्याची प्रतीक्षा तर करीत नाही ना असे बोलले जात आहे.
नांदपूर येथे असलेल्या कंपनीच्या कार्यालयांतर्गत येत असलेल्या या गावातील विद्युत पुरवठ्याच्या कामकाजासाठी देण्यात आलेला विद्युत वितरण कंपनीचा कर्मचारी हा वायरमन गावकऱ्यांच्या बोलण्याकडे सतत दुर्लक्ष करीत असल्याने ही समस्या निकाली निघाली नसल्याचे गावातील नागरिक बोलत आहे. या यामुळे हा कर्मचारी केवळ नावापुरताच असल्याचे बोलले जात आहे. या गावातील विद्युत पुरवठा नेहमीच खंडीत होतो. कोणताही बिघाड झाला की खासगी तांत्रिकाकडून त्याची दुरूस्ती करावी लागते. यात गावकाऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.(प्रतिनिधी)