संत भानुदास महाराज संस्थेला जिल्हाधिकाºयांची आकस्मिक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 10:30 PM2017-11-14T22:30:24+5:302017-11-14T22:30:39+5:30
स्थानिक श्री संत भानुदास महाराज संस्थेला शिक्षण दिनानिमित्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अचानक भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धमनेरी : स्थानिक श्री संत भानुदास महाराज संस्थेला शिक्षण दिनानिमित्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अचानक भेट दिली. प्रारंभी त्यांनी बाबांचे दर्शन घेतल्यानंतर संपूर्ण परिसराची पाहणी केली. अंध, अपंग, मूकबधीर युनिटला भेट देत माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकाºयांच्या आकस्मिक भेटीने संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थीही भारावून गेले होते.
नवाल यांनी येथील वातावरण आनंदमय असल्याचे नमूद केले. जिल्हाधिकाºयांचे पदाधिकाºयांनी स्वागत केल्यानंतर अंध मुलांनी स्वागत गित सादर केले. नवाल यांनी मार्गदर्शन करताना मूकबधीर मुलांची यादी माझ्याकडे द्या. मी सर्व मुलांना कर्णबधीर यंत्र देणार आहे. अपंग मुलांना तीन चाकी सायकल देण्याचा प्रयत्न करणार आहे. याव्यतिरिक्त काही अडचणी भासल्यास मी माझ्यापरीने सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी स्वयंरोजगारासारखे युनिट सुरू करा. मी त्यालाही मान्यता व निधी देण्याचा प्रयत्न राहिल, असे सांगत बºयाच उपाययोजना सूचविल्या. यावेळी संस्थेचे संचालक राजू मालानी, सचिव ज्ञानेश्वर निमकर तथा सर्व युनिटचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी, गावातील नागरिक, श्री सद्गुरू विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक नांदे, देशमुख, सावरकर, गिरडकर आदींची उपस्थिती होती.
गावातील काही शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना काही महत्त्वाच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. यानंतर त्यांना दहा मिनीटांचा वेळ मागून पिकाच्या पैसेवारीबाबत माहिती जाणून घेतली. वर्धमनेरी येथील पिकाची पैसेवारी ७० ते ७२ टक्के लावण्यात आली आहे. यावर मी पुन्हा सर्व्हे करण्याकरिता सूचना देतो, असे नवाल यांनी सांगितले. रिडींग न घेता सरसकट १५ ते २० हजरांपर्यंत देयके देण्यात आली. चालू बिलही दोन ते अडीच हजारापर्यंत देण्यात आल्याची तक्रार शेतकºयांनी नवाल यांना केली. यावर जिल्हाधिकाºयांनी मुख्य अभियंता वर्धा यांच्याशी भ्रमध्वनीवर चर्चा केली. सर्व कृषीपंप धारकांना मिटरचे रिडींग घेवून देयके देण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. गावातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी टिपले यांच्या तक्रारी केल्या. याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी चर्चा करून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी, तहसीलदार, शासकीय अधिकारी यांच्या ताफ्यामुळे गावात उत्साह दिसून येत होता.
माहिती असताना तलाठ्याची गैरहजेरी
जिल्हाधिकारी तथा तहसीलदार गावात येणार असल्याची माहिती तलाठ्यांना होती. असे असताना त्या कार्यालयात उपस्थित राहिल्या नाहीत. यामुळे अधिकाºयांसह ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थ व प्रशासन यांच्यातील दुवा असलेल्या ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांना समज देण्याची मागणीही करण्यात आली.