योजना कामगाराबाबत केलेल्या घोषणेनुसार शासन आदेश त्वरित काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:42 PM2018-01-17T23:42:24+5:302018-01-17T23:42:40+5:30
योजना कामगाराबाबत केलेल्या घोषणेनुसार शासन आदेश त्वरित काढून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी अंगणवाडी सेविकांनी बजाज चौकातून मोर्चा काढला. मोर्चा दुपारी १ वाजता जि.प. कार्यालयावर धडकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : योजना कामगाराबाबत केलेल्या घोषणेनुसार शासन आदेश त्वरित काढून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी अंगणवाडी सेविकांनी बजाज चौकातून मोर्चा काढला. मोर्चा दुपारी १ वाजता जि.प. कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन जि.प. प्रशासनाला सादर केले.
दरम्यान, निवेदनाची प्रत जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाºयांमार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधितांना पाठविण्यात आली आहे. बजाज चौकातून निघालेल्या मोर्चाने इतवारा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्ग जि.प. कार्यालय गाठले. पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या द्वारासमोर आंदोलकांना अडविल्याने ठिय्या आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, शालेय पोषण आहार कर्मचाºयांना किमान समाधानकारक वेतन द्यावे. ३३ महिला खासदार पार्लमेंट कमिटीच्या शिफारशीची अंमलबजावणी करा. आशा व गटप्रवर्तकांना किमान वेतन कायद्यापमाणे एनएचएम व पीआयपीमध्ये केलेल्या शिफारशीनुसार आशांना १७,२०० रुपये तर गटप्रवर्तकांना २५,००० रुपये एकत्रित वेतन द्यावे. अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधन वाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार त्वरित आदेश काढावे. अंगणवाडी कर्मचाºयांना आजारपणाची रजा द्यावी आदी मागण्या लावून धरण्यात आल्या. आंदोलनात दिलीप उटाणे, मनोहर पचारे, विजया पावडे, वंदना कोळणकर, असलम पठाण, गजेंद्र सुरकार, गुणवंत डकरे, ज्ञानेश्वर डंभारे, मैना उईके, मंगला इंगोले, विमल कौरती, सुनंदा आखाडे, शोभा तिवारी यांच्यासह अंगणवाडी सेविका सहभागी होत्या.