न.प.च्या तहकूब सभेवर आरोप

By admin | Published: September 12, 2015 01:59 AM2015-09-12T01:59:39+5:302015-09-12T01:59:39+5:30

शहराच्या विकासाच्या नावावर काँग्रेससह सेना व अपक्ष अशा १४ नगरसेवकांची स्थापन झालेली आघाडी तोडून काँग्रेसचे चार व सेनेच्या एका नगरसेवकाने ....

Accusations against NP's abusive session | न.प.च्या तहकूब सभेवर आरोप

न.प.च्या तहकूब सभेवर आरोप

Next

प्रत्यारोपाचे राजकारण: दोषीवर कार्यवाहीची विरोधकांची मागणी
पुलगाव : शहराच्या विकासाच्या नावावर काँग्रेससह सेना व अपक्ष अशा १४ नगरसेवकांची स्थापन झालेली आघाडी तोडून काँग्रेसचे चार व सेनेच्या एका नगरसेवकाने आघाडीला रामराम केला. भाजपाच्या पाच नगरसेवकांशी हात मिळवणी करून सत्ता काबीज केली. अशात नगराध्यक्ष मनीष साहू यांनी गुरुवारी घेतलेली सभा अचानक तहकूब केली. यामुळे सत्तारूढ व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरु झाला. यामध्ये दोषींवर कार्यवाईची मागणी विरोधकानी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
येथील नगर परिषदेद्वारा गुरुवारी दुपारी १ वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे विरोधी गटाचे नऊ व एक स्वीकृत असे १० सदस्य दुपारी १ वाजता सभागृहात उपस्थित झाले. या सभागृहात मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर, नगराध्यक्ष मनीष साहू यांच्यासह सत्तारूढ गटाचे नगरसेवक व संबंधित कर्मचारी यापैकी कुणीही उपस्थित नव्हते. तेव्हा उपस्थित नगरसेवकांनी संबंधित कर्मचाऱ्याकडे याबाबत विचारणा केली असता त्याने नगराध्यक्षांनी सभा तहकूब केल्याचे सांगितले. याबाबत इतर नगरसेवकांना कुठलाही पूर्व सूचना देण्यात आली नाही. किंवा तहकुबीबाबत नोटीस बोर्डवर तशी सूचनाही लावण्यात आली नव्हती. नगरसेवकांनी एकमताने क ५८ पोटकलम (१) खंड (अ) अन्वये उपाध्यक्ष यांना पिठासीन अधिकारी म्हणून निवड करून सभा सुरू केल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सभा तहकूब झाल्याचा नोटीस लावला.

Web Title: Accusations against NP's abusive session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.