विनयभंगप्रकरणी आरोपीला तीन वर्षे कारावास
By admin | Published: July 14, 2016 02:08 AM2016-07-14T02:08:09+5:302016-07-14T02:08:09+5:30
एकटीच असलेल्या मुलीच्या घरात शिरून विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षे कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.
वर्धा : एकटीच असलेल्या मुलीच्या घरात शिरून विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षे कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. हा निर्वाळा विशेष न्यायदंडाधिकारी एम.डी. पुरवार यांनी बुधवारी दिला.
२३ एप्रिल २०१४ रोजी पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत एकटी असलेल्या मुलीच्या घरी दुपारी ३ वाजता आरोपी अमोल संजय माहुरे (२३) रा. नाचणगाव याने प्रवेश केला. मुलीचा हात पकडून अश्लील संभाषण केले. दरम्यान, मुलीने आरडाओरड केल्याने आरोपी पळाला. तिने आर्ई-वडिलांना घटना सांगितली. तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी कलम ३५४ अ, ४५२ सहकलम ८ लहान मुलांंचे लैंगिक शोषण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चौधरी यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. युक्तिवाद ऐकल्यानंतर लहान मुलांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा विशेष न्यायालय न्याय दंडाधिकारी पुरवार यांनी आरोपीला एक वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने कारावास तर कलम ८ अन्वये तीन वर्षे कारावास व दंड न भरल्यास २ महिने अति.कारावास अशी शिक्षा सुनावली. पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अ.पो. अधीक्षक स्मीता पाटील, एसडीपीओ विजय कुहीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिरतोडे, बुराडे, प्रियंका चौधरी, विवेक बन्सोड, पैरवी अधिकारी अशोक फरताडे यांनी सहकार्य केले. सरकारी अभियोक्ता वानखेडे यांनी काम पाहिले.(कार्यालय प्रतिनिधी)